सुपरस्टार राजेश खन्ना आणि जितेंद्र यांनी या प्रसिद्ध अभिनेत्रींना मेकअप रूममध्ये का बं’द करून ठेवले, आणि त्यानंतर जे घडले…
बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींमध्ये सर्रास होणाऱ्या कॅटफाइटच्या बातम्या बऱ्याचदा म्हणजे आजकाल तर दिवसागणिक ऐकायला मिळतात. रोज उठून कुणी ना कुणी एकमेकांवर प्रिंट मीडिया, सोशल मीडिया इ. वर चिखलफेक करतच असते. ह’ल्लीच्या काळी त्याला ना कुठला धरबंध असतो ना कुठले ता’ळ’तं’त्र आणि विधिनि’षे’ध.
आज जसे अत्यंत खालच्या पातळीवर उतरून थेट अगदी चारित्र्यहनन करण्यापर्यंत मजल जाते तसे आधीच्या काही दशकांत नव्हते. नाही म्हणजे भां’ड’णे, म’त’भे’द, अबोला हे सर्व तेंव्हाही होतेच की, पण त्यातही एक डि’ग्नि’टी, आ’ब, तो’रा होता. कारण इगो प्रॉ’ब्ले’म्स हा ट्रेंड तसा काही फारसा जुना नाहीय. असाच एक मनोरंजक किस्सा स्टार मराठीच्या आमच्या खास वाचकांसाठी.
१९८० च्या दशकात बॉलीवूड सिनेमासृष्टीत एकाच वेळी अनेक दिग्गज आणि प्रचंड लोकप्रियता लाभलेले कलाकार काम करत होते. आपापल्या करियरच्या विशिष्ट उंचीवर असलेल्या या कलाकारांमधील दोन दिग्गज अभिनेते किंवा अभिनेत्रींमध्ये होणारी भां’ड’णे ही त्याकाळी खूपच सामान्य होती.
त्यातही त्याकाळची सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी आणि तिच्याच तो’डीची दुसरी लोकप्रिय अभिनेत्री जया प्रदा यांच्यात असलेल्या भां’ड’णाची आणि त्यांच्यातील दिर्घकालीन अबोल्याचीच सर्वाधिक चर्चा होती किंबहुना सिनेवर्तुळात ती अजूनही चवीने च’घ’ळ’ली जाते कारण, या दोघीही त्या काळातील टॉप अभिनेत्री होत्या. या दोघींनी ‘तोहाफा’, ‘औलाद’, ‘नया कदम’, ‘फरिश्ते’, ‘माजल’, ‘मा’व’ली’, ‘मैं तेरा दु’श्म’न’ यासारख्या जवळपास सुमारे नऊ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलेले होते.
अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करणाऱ्या या दोन अभिनेत्रींचे रियल आयुष्यात मात्र एकमेकींशी अजिबातच पटत नव्हते. त्यांना एकमेकींचे स्वभाव, वागणेही पसंत नव्हते. होय, आणि याचा पुरावाच द्यायचा झाला तर, या दोघींच्या टो’काच्या अबोल्याचा हा मनोरंजक किस्सा.
तर ही घटना त्या दोघी एकत्र काम करत असलेल्या “मकसद” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संबंधित सर्वांनीच अनुभवली. या दोघीही या चित्रपटाच्या नायिका होत्या आणि जितेंद्र – राजेश खन्ना या चित्रपटाचे नायक होते. चित्रपटाचे शूटिंग जोरदार गतीने सुरू होते. पण श्रीदेवी-जयाप्रदा एकमेकींशी बोलत नव्हत्या.
कुणीही कुणाला भाव देण्याच्या मन: स्थितीतही नव्हत्या. सेटवर त्या दोघींमध्ये कोणताही संवाद होत नव्हता. जितेंद्र आणि राजेश खन्ना यांच्या हे लक्षात आले आणि त्यांना ते आवडलेही नाही, अशा परिस्थितीत दोन्ही कलाकारांनी एक योजना आखली.
राजेश खन्ना आणि जितेंद्रनी जया प्रदा आणि श्रीदेवीला एकाच मेकअप रूममध्ये बं’द करुन बाहेरुन लॉक केले. जितेंद्र आणि राजेश खन्ना यांना वाटले की असे केल्याने या दोन्ही अभिनेत्री एकमेकांशी बोलू लागतील कारण बं’द केल्यानंतर मेकअप रूममध्ये दोघीही एकट्याच असतील. नंतर मग जवळजवळ दोन तासांनंतर या दोघांनी जेव्हा मेकअप रूम उघडला तेव्हा दोन्ही कलाकारांना आत जे दृश्य दिसले ते पाहिल्यामुळे आश्चर्यच वाटले.
जयाप्रदा आणि श्रीदेवी ता दोघी एवढ्या मोठ्या मेकअप रूममध्ये दोन टोकाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात एकमेकींशी एक अक्षरही न बोलता, एकमेकींच्या वि’रु’द्ध दिशेला तोंडे करून एकेकट्याच बसल्या होत्या. त्याचवेळी आपला प्रयत्न अयशस्वी झाल्याचे पाहून राजेश खन्ना आणि जितेंद्र मात्र खूप नि’रा’श झाले. आणि स्वतःहून सर्वांच्या टिं’ग’ल’ट’वा’ळीचा विषय बनले होते. संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होईपर्यंतही त्यांचा हा अबोला कायमच राहिला.
मित्रांनो!, म’न’भे’द…म’त’भे’द असावेत पण त्यातही स्वतःच्या अभिमानासोबतच दुसऱ्यांच्या स्वाभिमान जपण्यातही एक निराळीच ऐट असते… शान असते. नाही तर आताच्या हिरॉइन्स पहा… असो!
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.