प्रेमासाठी नवरी दोन देशांच्या सीमा पायी चालत पार करून आली, पण नंतर लग्न…

Advertisement

“सात जन्मांचे बंधन हे अनोखे, रेशीम गाठींचे नाते हे निराळे”. मित्रांनो लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन तसेच दोन वेगवेगळ्या परिवारांचे ऋणानुबंध.” आयुष्यात प्रत्येक व्यक्ती ही आपल्या जोडीदाराला भेटायला त्याला समजून घ्यायला खूपच उत्सुक असते.

तो किंवी ती कशी असेल, ह्या विचारांनी खरं तर सर्वांनीच सुंदर स्वप्न सजवलेली असतात. आपल्या स्वप्नातील जोडीदार जेव्हा अगदी काही अंतरावर असेल, तेव्हा त्याच्या भेटीसाठी खरंच आपण काय काय करू शकतो. आम्ही तुम्हांला आज अशाच एका क्यूट कपल विषयी सांगणार आहोत.

Advertisement

सात जन्मांचे बंधन हे किती पवित्र असते ना…. याचेच एक प्रत्यक्ष उदाहरण भारत व नेपाळच्या सीमेवर “झुलनीपुर” येथे पाहायला मिळाले. भारतातील नवरा मुलगा हा आपल्या नेपाळमधील होणाऱ्या पत्नीच्या घरी पायी- पायी चालत जाऊन सर्व परंपरेनुसार विधीवत लग्न तर केलेच. तसेच पुन्हा तो नवरा मुलगा आपल्या भावी आयुष्याच्या नवरीला घेऊन सीमेपर्यंत पोहोचला. त्यानंतर ते दोघेही तेथून आपल्या गाडीने घरी पोहोचले.

See also  या ८ राशींसाठी यंदाची मकर संक्रांती आहे खूपच फलदायी, तर या ४ राशींसाठी...

रामपुर जिल्ह्यात राहणाऱ्या नवऱ्या मुलाचे वडील प्रदीप चौहान यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाचे लग्न नेपाळमधील नवलपरासीच्या गोकुळ नगर या गावातील राजेंद्र चौहान यांच्या मूलीसोबत ठरले होते. या पवित्र विवाह सोहळ्यासाठी नवरा मुलगा ठरलेल्या वेळेनुसार सीमेपर्यंत तर पोहोचला. परंतु कोरोना लॉकङाऊनमुळे गाड्यांना आतमध्ये जाण्याची परवानगी नव्हती.

Advertisement

सीमेच्या आतमध्ये कोणत्याही गाड्या जाऊ शकणार नाहीत, हे माहित झाल्यावर नवऱ्या मुलानेही आपल्या प्रेमाच्या व सात जन्मांच्या नात्यासमोर दोन देशांच्या मध्ये आलेल्या सीमेवरील संकटानांही उधळून लावले आहे. तुम्हांला माहित आहे का?

या ङॅशिंग नवऱ्या मुलाने बिकट परिस्थितीतही नवऱ्या मुलीच्या घरी जाऊन विधीवत सुंदर रीतीने तिच्यासोबत लग्न केले आहे. इतकंच नव्हे तर सर्व रितीरिवाज पूर्ण झाल्यानंतर आपल्या नेपाळी पत्नीला घेऊन पायी- पायी पुन्हा आपल्या घरी रवाना झाले.

See also  विशेष यशप्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यात करा श्री विष्णूप्रिय सफला एकादशी व्रत, जाणून घ्या महत्व, मुहूर्त, मंत्र...
Advertisement

लक्ष्मीपुर येथील सीमेपर्यंत आल्यावर हे नवं दाम्पत्य गाडीतून आपल्या घरी गेले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दोघांचेही स्वागत केले. या अनोख्या विवाहाची चर्चा तर संपूर्ण राज्यात होत आहे.

यावरून तर मित्रांनो तुम्हांला देखील समजले असेल की, आपल्या आयुष्याच्या जोडीदाराला आपण कोणत्याही परिस्थितीत जवळ आणू शकतो. फक्त मनामध्ये विश्वास असला पाहिजे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ड्वेन जाॅनसन दुसऱ्यांदा झाला जगभरातला सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता, एका वर्षभरातील कमाई पाहून थक्क व्हाल!
Advertisement

Leave a Comment

close