या कारणांमुळे राजकुमार सलमान खानवर भडकून म्हणाले, ” तुझ्या बापाला जाऊन विचार मी कोण आहे ?..”

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

कसं असतं हे मनोरंजन क्षेत्रात अनेक गोष्टी रोज घडत असतात. अनेक घडूनही गेलेल्या असतात. काही अनेक वर्षांनी लोकांसमोर येतात. तर आज आपण असाच एक किस्सा जाणून घेणार आहोत. जो आपल्याला नक्कीच वाचून जुन्या दिवसात घेऊन जाईल. राज कुमार हे किती रागीट आहेत, हे त्यांच्या चाहत्यांना माहितीच असेल. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान एकदा अभिनेता राज कुमार यांच्या रागाचे बळी ठरले होते.

सलमान खान इंडस्ट्रीत नवीन होते आणि पहिल्यांदा एका पार्टीमध्ये ते राज कुमारला भेटले. या भेटीदरम्यान, सलमान खान यांच्या एका गोष्टीचा राग आल्याने राज कुमार यांनी पार्टी सोडली. सलमान खान यांच्या वर राजकुमार यांच्या नाराजीचे कारण काय होते ? ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया सविस्तर..

See also  हुबेहूब अभिनेता अक्षय कुमार सारखा दिसतो हा माणूस, फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल!

राजकुमार यांना एका मोठ्या बॉलिवूड पार्टीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. अभिनेता राजकुमार हे भेटलेल्या अनेकांना लोकांना त्यांच्या मनाविषयी नितळ निखळ पणे सांगत असत, कोणाला आवडल की नाही. याचा ते विचार करत नाहीत. इंडस्ट्रीत टॉप वर असल्याने अनेक लोक राजकुमार यांच्या कडे यायचे. जे लोक वर्तन पाहून त्यांना असभ्य म्हणत असत.

एकदा बॉलिवूडचा दबंग खान, सलमान खान यांनी त्यांच्या समोर एक चूक केली. यामुळे राजकुमार हे सलमान खानवर प्रचंड चिडले. जेव्हा 90 च्या दशकात सलमान खान यांचा ‘मैने प्यार किया’ हा चित्रपट हिट झाला होता. 19 डिसेंबर 1989 रोजी चित्रपटाचे यश साजरे करण्यासाठी पार्टी आयोजित करण्यात आली होती.

See also  'द डर्टी पिक्चर' फेम विद्या बालनने चित्रपट चित्रपटातून नव्हे तर मालिकेतून केली होती सिनेमामध्ये एन्ट्री...

अभिनेते राज कुमार यांनाही चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी पार्टीसाठी आमंत्रित केले होते. पार्टीत राजकुमार हे सूरज बडजात्या यांना सलमान खानला भेट म्हणून सांगतात. सलमान हे राजकुमार यांना भेटतात. तेव्हा सलमान हे राजकुमारला ओळखू शकले नाही आणि चुकून राजकुमार यानांच विचारले की तू कोण आहेस ? हे ऐकल्यावर राजकुमार संतापले आणि म्हणाले की बेटा, जा तुझ्या वडिलांना जाऊन विचार मी कोण आहे ते ?

यानंतर दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी सलमान खानला सांगितले की ते राज कुमार आहेत. हे ऐकल्यावर दबंग खानने राज कुमारची माफी मागितली, पण राज कुमार तिथून निघून गेले होते.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment