गोविंदाने दिलेल्या या भेटवस्तूचा अभिनेता राजकुमार यांनी नाक साफ करण्यासाठी केला होता वापर; सर्व प्रकार ऐकून शॉक व्हाल!
“भिन्न भिन्न व्यक्ती तशाच विभिन्न प्रवृत्ती” आपल्याला तऱ्हेतर्हेचे अनेक लोक या जगात पाहायला मिळतात. काही गोड स्वभावाचे असतात. तर काही खवट स्वभावाचे असतात. तर काही महाशय हे एवढे विचित्र असतात की त्यांना सहन करणे, फार अवघड होते.
आपल्या बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये अभिनेते राजकुमार हे देखील थोडे विक्षिप्त स्वभावाचे होते, हे तर सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी आपली एक वेगळीच छाप चाहत्यांच्या हृदयावर उमटवली होती. त्यांनी कित्येक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. तसेच त्यांचे ङायलॉग् एवढे कमालीचे असायचे की फॅन्सचे ते ङायलॉग तोंडपाठ व्हायचे. इतकंच नव्हे तर आजची तरूणपिढी सुद्धा राजकुमार यांच्या ङायलॉग्जला पसंती देते.
राजकुमार हे देखील खवट स्वभावाचे अभिनेते म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या अशा स्वभावामुळेच बॉलीवुड मधील बहुतेक स्टार्स सोबत त्यांचे पटत नव्हते. अनेकदा त्यांचे कलाकारांसोबत भांडण सुद्धा व्हायचे. अभिनेता गोविंदा याचा पण त्यांनी एकदा अपमान केला होता.
गोविंदाच्या शर्टची केली स्तुती : अभिनेता गोविंदाने तेव्हा इंडस्ट्रीमध्ये आपल्या करियरची नुकतीच सुरुवात केली होती. 1988 मध्ये अभिनेता गोविंदा व राजकुमार हे एकत्र “जंगबाज” या चित्रपटासाठी काम करत होते. हा किस्सा तेव्हाचा आहे. एकदा राजकुमार असेच सेटवर बसले होते. तेव्हा गोविंदाची राजकुमार यांच्यासोबत पहिली भेट झाली.
गोविंदाने आदराने त्यांना सलाम केला. तेव्हा गोविंदा खूप स्टायलिश कपडे घालायचे. त्या दिवशी सुद्धा त्याने अतिशय सुंदर आणि छान असा रंगीत शर्ट घातला होता. त्या दरम्यान राजकुमार गोविंदाला पायापासून ते ङोक्यापर्यंत न्याहाळत होते. मग राजकुमार गोविंदाला म्हणाले की,”तुझा शर्ट तर खूपच छान आहे.
अभिनेते राजकुमार यांच्यासारख्या दिग्गज कलाकाराने आपली स्तुती केली. म्हणून गोविंदा आनंदाने वेडेपिसे झाला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. म्हणून गोविंदा लगेचच मेकअप रूम मध्ये गेला आणि त्याने आपला शर्ट काढला आणि तो राजकुमार यांना भेट दिला. पण त्यानंतर गोविंदाने दिलेल्या शर्टची राजकुमार यांनी अशी अवस्था केली की, गोविंदा फक्त पाहतच स्तब्ध उभा राहिला.
काही दिवसांनंतर गोविंदाने सेटवर पाहिले की, आपला जो शर्ट त्याने राजकुमार यांना भेट दिला होता, त्याचा राजकुमार यांनी हातरूमाल बनवला होता. इतकंच नव्हे त्या रुमालाने ते आपले नाक स्वच्छ करत असत. हा सर्व प्रकार पाहून अभिनेता गोविंदा अक्षरशः हैराण झाला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.