अरे देवा ! अक्षय कुमारच्या सासूबाईंना तो आधी वाटत होता “गे”, त्यानंतर जे झाले ते…
बॉलीवुड इंडस्ट्रीचा सुपरङुपरहिट खिलाडी स्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षयकुमार याचे जगभरात करोडोंच्या संख्येने फॅन्स आहेत. त्याचा लवकरच “अतरंगी रे” हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री सारा अली खान आणि धनुष हे मुख्य भूमिकेत दिसतील. अक्षयकुमार च्या बाबतीत एक मजेशीर असा किस्सा आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. जो ऐकून तुम्हांला देखील खूप गंमत वाटेल.
अक्षयकुमारची सासू म्हणजेच ङिंपल कपाडिया यांना अक्षय ‘गे’ वाटायचा. त्यामुळे त्यांनी आपली मूलगी ट्विंकल हिला अगोदरच सल्ला दिला होता. त्याचे झाले असे की, ट्विंकल खन्नाला तिच्या एका पत्रकार मित्राने सांगितले होते की, अक्षयकुमार हा गे आहे. याच कारणामुळे ङिंपल कपाडिया यांनी ट्विंकलला सल्ला दिला होता की, तू आणि अक्षय एक वर्षभर एकमेकांसोबत राहा. त्यानंतर मग तुम्ही काय करायचे तो निर्णय घ्या.
एका शो मध्ये ट्विंकल खन्ना ने सांगितले होते की,”आईला अक्षय गे असल्यासारखे वाटत होते. म्हणून आमचे लग्न होऊच नये, असे तिला वाटायचे. त्यानंतर जेव्हा अक्षयने मला प्रपोज केले. त्याने मला लग्नाची मागणी घातली, असे मी जेव्हा आईला सांगितले तेव्हा ती खूप आश्चर्यचकित झाली.
अक्षयकुमारच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर “OMG 2” मधील त्याचा लुक सोशल मीडियावर वायरल झाला होता. अक्षयकुमारच्या फॅनपेजवर हा व्हिडीओ शेयर करण्यात आला होता. यामध्ये तो फुल टू स्टाईलमध्ये वॉक करताना दिसत आहे. त्यामध्ये त्याने ब्ल्यू रंगाची ङेनिम केप्री घातली आहे. त्याचसोबत क्रीम रंगाचा लाँग स्वेटर सुद्धा घातला आहे. परंतु त्याच्या हेअरस्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये त्याचे लांब केस पाहायला मिळत आहे. तसेच त्याने पोनी टेल बांधला आहे. अक्षय चा हा लुक चाहत्यांना भरपूर आवडला.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.