कुठे गायब आहे तारक मेहता मधील दया, सोशल मीडियावर दिशा वकानीच्या मृत्यूची पोस्ट व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मित्रहो गेल्या अनेक वर्षांपासून अतरंगी भूमिका पार पाडत रसिकांना खळखळून हसवण्यात “तारक मेहता….” या शो ने भरपूर यश मिळवले आहे. कोणतीही भूमिका सुरुवाती पासून ओळखीची कधीच नसते मात्र अभिनयात इतकी जास्त ताकद असते की ती भूमिका रसिकांच्या आवडीची बनून जाते. अगदी त्यांच्या आयुष्यातील असल्यासारखी बनते. त्यामुळे कोणताही शो असो किंवा मालिका आणि कार्यक्रम असो हे सर्वकाही बघता बघता घराघरात प्रसिध्द होत असतो. “तारक मेहता…” हा शो सुद्धा अनेकांना खूप आवडतो.

यातील प्रत्येक भूमिका लक्षवेधी असून अतरंगी पणा भरभरून आहे. त्यामुळे ही भूमिका निभावणारे सर्व कलाकार देखील अभियानात मुरलेले आहेत. यामधील सर्व भूमिका प्रचंड लोकप्रिय आहेत, दरम्यान आणखी एक भूमिका अशी आहे जी या शोमधील जीव आहे. ही भूमिका म्हणजे जेठलाल यांची पत्नी दयाबेन. अनेकांना ही भूमिका खूप जास्त आवडते, अप्रतिम अभिनयाचे उत्तम उदाहरण म्हणजे ही भूमिका आहे. खरच या भूमिकेचे आणि भूमिका निभावणाऱ्या स्त्री कलाकाराचे करावे तितके कौतुक फार कमी आहे.

See also  या अभिनेत्रीने इमरान हाश्मीला चक्क तो लालबुंद होईपर्यंत केलं 'कीस', हे दृश्य पाहून इतर लोक देखील हैरान झाले...

ही भूमिका अभिनेत्री दिशा वकानी यांनी निभावली होती, दिशा वकानी यांना अनेकजण खूप पसंत करतात. त्यांच्या अभिनयाचे आजही सर्वत्र भरपूर कौतुक होत असते. “तारक मेहता…” या शो मुळे त्यांना एक नवी ओळख मिळाली असून त्यांच्या मुळे या शो ला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली आहे. पण मागील पाच वर्षांपासून त्यांची ही भूमिका पडद्यावर दिसलीच नाही. त्यांच्या परत येण्याची अनेकजण आतुरतेने वाट पहात आहेत. त्यांच्या बद्दल सर्व चाहते खूप काही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

त्यांची परत येण्याची वाट बघत असतानाच त्यांच्या बद्दल अनेक प्रश्न उभे होत आहेत. लोक खूप काही विचारत आहेत, दिशा वकानी यांची एक झलक पाहण्यासाठी लोक खूप आतुर आहेत. काहीजण तर दिशा वकानी जिवंत आहेत का असे देखील विचारत आहेत. खरेतर दिशा या शो पासून दूर आहे, सोशल मीडियावर देखील त्या लवकर येत नाही. चाहत्याना अशीही भीती आहे की त्यांची तब्येत ठीक असेल की नसेल. पण मित्रहो घाबरण्याचे काही कारण नसून दिशा अगदी व्यवस्थित आहेत, शिवाय गोड बातमी अशी आहे की नुकताच त्यांनी आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे.

See also  लॉकडाउन मध्ये सुपरस्टार अभिनेता अजय देवगणने खरेदी केली ही कार, कारची किंमत ऐकून थक्क व्हाल!

अनेकांना असे वाटते की दिशा यांनी हा शो सोडला आहे, मात्र दिशा असे कधीच म्हणाल्या नाहीत. एवढे लोकप्रिय आणि प्रसिद्ध झाल्यानंतर दिशा पडद्याआड का झाल्या असाव्या असा अनेकांना प्रश्न पडला आहे. २०१७ मध्ये दिशा मॅनरलिटी लिव्ह वरती गेल्या होत्या, त्यांनी आपल्या परिवाराला आणि मुलांना खास वेळ देण्यासाठी कामातून ब्रेक घेतला होता. शो सोडला असल्याचे त्यांनी कधी म्हणले नाही,शिवाय मेकर्सने सुद्धा कधी असे जाहीर केले नाही. मेकर्सने दयाबेनच्या भूमिकेत आजवर कोणालाही अप्रोच केले नाही. त्यामुळे लोक आजही या भूमिकेत दिशाची आतुरतेने वाट बघत आहेत.

तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

See also  बाहुबली चित्रपटातील हा मास्क घातलेला सीन सोशल मीडियावर होतोय प्रचंड वायरल, तुम्हीही पहा हा विडिओ...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment