कॉलेजमध्ये असताना अभिनेत्री नीना गुप्ता “या” मुलावर होत्या जबरदस्त फिदा, आता तोच आहे प्रसिद्ध अभिनेता…
“क्रश” म्हणजे हृदयाचे व्यसन, थोडक्यात म्हणजे काही लोकांसाठी तर जीव की प्राण असते. परंतु आपल्या क्रश ची भविष्यात जर एका वेगळ्याच अंदाजात ओळख झाली, तर काय होईल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का बरं…असाच एक अफलातून किस्सा आज आम्ही तुमच्याशी शेयर करत आहोत.
अभिनेत्री नीना गुप्ता या फिल्म आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेत. नेहमी मस्तीमूङ व हसतखेळत असणाऱ्या नीना गुप्ता या हल्लीच आपली ऑटोबायोग्राफी “सच कहूं तो” यामुळे अधिकच चर्चेत आल्या आहेत. त्यांनी आपल्या या पुस्तकात आपलं आयुष्य, अफेयर्स, सिनेमातील काम आणि आपली मुलगी मसाबा या संदर्भातील अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. परंतु तुम्हांला ठाऊक आहे का, आता नीना यांनी आणखी एक अनोखा किस्सा शेयर केला आहे.
नीना यांना ‘आवडायचा’ तो बाइकवाला मुलगा : “सच कहूं तो” यामध्ये अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या कॉलेजमधील दिवसांविषयी सांगितले आहे. त्यांनी जानकी देवी महाविद्यालय ( जानकी देवी मेमोरियल कॉलेज) मधून स्वतःचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्यांनी सांगितले की, कॉलेजच्या त्या दिवसांत त्या आपल्या मैत्रीणीसोबत दोन बाईकर मुलांना सतत पाहत बसायच्या. त्यातील एक कुणी दुसरं- तिसरं नसून शक्ती कपूर होते.
अभिनेत्री नीना गुप्ता या लिहितात की,”ती दोन मुलं अशी होती की, त्यांना पाहण्यासाठी कॉलेजमधील सगळ्या मुलींचा जीव अगदी कासावीस व्हायचा. ते दोघेही खूप छान तयार व्हायचे, दिसायला पण हँडसम होते. त्यांच्यातील एकाचे ङोळे खूपच वेगळे पण सुंदर होते.” मला कित्येक दिवसांनंतर शक्ती कपूरविषयी आणि कॉलेजमधील किस्से शेयर करताना समजले की, ते “WEA” मध्ये राहायचे आणि त्यांची गर्लफ्रेंड सुद्धा जानकी देवी मध्येच होती. त्यांनी मला सांगितले की,”मी माझ्या बाइकवर तिला पिक करायचो.”
त्यांनी पुढे लिहिले की,”एकंदरीत आम्ही संपूर्ण आयुष्य एकमेकांच्या आसपासच जगलो. परंतु तरीही आमचे रस्ते कधीच एक झाले नाहीत. मला विश्वासच बसत नाही की,”तो ( शक्ती ) त्या मुलांमधील एक होता, ज्याच्यावर कॉलेजमधील सगळ्या मूली फिदा व्हायच्या. इतकंच नव्हे तर त्याच्या गर्लफ्रेंड वर सगळे जळत असत.”
सिंगल असल्यामुळे दुःखी होत्या निना : अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सांगितले की,”कशाप्रकारे त्यांच्या कॉलेजमधील कित्येक मूली आणि त्या स्वतः सिंगल असल्यामुळे खूप नाराज असायच्या. त्यांनी लिहिले की,”मी दुःखी होऊन विचार करायची की, मी सिंगल का आहे? मी तर इतर मूलींपेक्षा पण सुंदर दिसते. मला असे वाटायचे की, माझा पण एखादा बॉयफ्रेंड असावा. जो मला बाइकवर घेऊन जाईल. अशाप्रकारे अभिनेत्री नीना गुप्ता यांनी आपल्या कॉलेजमधील व्यथा मांडल्या आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.