कोण होऊ शकतो शरद पवारांचा वारसदार? वाचा, काय आहेत अजितदादा आणि सुप्रियाताईंच्या शक्यता…
सर्वसाधारणपणे प्रत्येक राजकीय नेत्याला मुलगा असतोच. कारण मुलगी ही लग्न करून दुसऱ्या घरी जाते मग आपला राजकीय वारसा कोण चालवणार? हा प्रश्न मनात असलेले अनेक छोटे मोठे राजकीय नेते आपल्याला भेटत असतात. गाव ठिकाणी असे कित्येक नेते आहेत, ज्यांनी मुलगा व्हावा म्हणून 3 मुलीनंतरही प्रयत्न केलेले आहेत. अर्थात शरद पवारांसारख्या धोरणी विचारांचा आणि मु’स्स’दी नेता याला अपवाद आहे. मुलगी वारसदार असणे, ही गोष्ट आजही भारतीय समाजात रुजलेली नाही. त्यातल्या राजकीय क्षेत्रात तर ‘मुलगी वारसदार’ ही संकल्पना रुजायला कित्येक वर्षे लागतील.
शरद पवार यांनी कायमच आर.आर.पाटील, दिलीपराव वळसे पाटील, जयंत पाटील यांच्यात आपला वारसदार शोधण्याचा प्रयत्न केला. खरे तर सुरुवातीच्या काळात अजित पवार यांना शरद पवार यांचा वारसदार म्हटले जायचे. नंतरच्या काही वर्षात अजित पवार यांचा स्वभाव, विचार धोरणे ही शरद पवारांशी मिळतीजुळती नाहीत, याची चर्चा होऊ लागली आणि सुप्रिया सुळे यांच्या राजकीय एन्ट्रीने अजित पवारांच्या वारसदार असण्याला पूर्णविराम मिळाला.
पवार यांचे वारसदार कोण असतील? याच्या चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच घडत असतात. त्यातल्या त्यात निवडणुका असल्यावर या चर्चांना उधान येते. मात्र पवारांनी अनेकदा उल्लेख केला आहे की, वारसदार कोण असावा, हे लोक निवडत असतात.
समजा एखादा व्यक्ती त्यांनी वारसदार म्हणून निवडला आणि सदर व्यक्तीला लोकांनी स्वीकारले नाही तर त्याला वारसदार कसे म्हणता येईल?हाही प्रश्न पवार उपस्थित करतात.
एकदा पवार यांना तुमचे राजकीय वारसदार अजित पवार असतील की सुप्रिया सुळे असतील? असा प्रश्न विचारला गेला होता. त्यावर पवारांनी हजरजबाबी स्वभावाने उत्तर दिले की, जित पवारांना राज्याच्या राजकारणात रस आहे त्यामुळे ते विधानसभेत आहेत. सुप्रिया सुळेंना देशाच्या, महिलांच्या, शिक्षणाच्या प्रश्नात रस आहे म्हणून त्या संसदेत आहेत. वारसदाराचा राजकीय प्रश्न पक्ष आणि कुटुंबाच्या वि’रो’धा’त जाऊ नये म्हणून केलेली ही रचना आहे.
असे असले तरीही सुप्रिया सुळेंची जेव्हा राजकीय एन्ट्री झाली तेव्हा त्यांच्याकडे राजकीय वारसदार म्हणून पाहिले जाऊ लागले. दिवसेंदिवस सुप्रियाताईंचे पक्षात आपले वजन वाढत होते. तसेच माध्यमांसमोरही आता पक्षाच्या वतीने अजितदादा फोकस होत नव्हते. त्यांच्याऐवजी सुप्रियाताई फोकस होऊ लागल्या. अगदी पक्षाच्या सोशल मिडीयावरही अजितदादांपेक्षा सुप्रियाताई जास्त असायच्या.
सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झालेल्या तुम्हाला आवडेल का? असा प्रश्न 3 वर्षांपूर्वी अजितदादांना विचारल्यावर त्यांनी म्हटले होते की, का आवडणार नाही? कोणत्या भावाला आपली बहीण मुख्यमंत्री झालेली आवडणार नाही?
अजितदादा आणि सुप्रियाताई यांच्यातील बहिण-भाऊ म्हणून संबंध खूप चांगले असले तरी पक्षीय राजकारणात दोघांचे २ गट आहेत. अलीकडच्या काळात अजितदादांची नाराजी वाढत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. पार्थ यांचा प’रा’भ’व आणि रोहित यांच्या एन्ट्रीसह दणदणीत विजय या दोन्ही गोष्टीही लक्षात घेणे, गरजेचे आहे.
पार्थ यांना उमेदवारी द्यायला पवार लवकर राजी झाले नाहीत. तर दुसऱ्या बाजूला रोहित पवारांच्या धडाडी वृत्तीमुळेच विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान ‘माझं पंतप्रधान होण्याचं अर्धवट राहिलेलं स्वप्न माझा नातू पूर्ण करेल’ असं विधान खुद्द शरद पवारांनी केलं होतं. शरद पवारांनी रोहित पवारवर दाखवलेल्या या विश्वासाने रोहितच्या आई सुनंदा पवार यांना अ’श्रू अनावर झाले होते.
पवारांचा राजकीय वारस आता रोहित असण्याची शक्यताच जास्त आहे. कारण सुप्रियाताई यांचे नेतृत्व महिला म्हणून सर्वाथाने स्वीकारले जाईल की नाही? यात शं’का आहे.
रोहित यांच्याकडे शरद पवारांचे अनेक गुण आहेत. बेरजेचं राजकारण, दांडगा जनसंपर्क, संयम आणि योग्य भूमिका हे आजोबांचे गुण रोहित यांच्याकडे आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे रोहित यांच्यासाठी शरद पवार हे नेहमी आग्रही असतात.
रोहित पवार यांना पक्षात आणि महाविकास आघाडीत मिळणारे स्थान, राज्यात असलेले पक्षापलीकडचे चाहते, त्यांचे वाढते राजकीय वजन आणि महत्व बघता भविष्यात शरद पवार यांचे राजकीय आणि वैचारिक वारसदार रोहित असण्याची शक्यता पहिल्यापासून बोलली जात आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.