देवमाणूस मालिकेतील ही फॉरेनर नक्की आहे तरी कोण? याआधी तिने केलं होतं इथे काम जाणून घ्या.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

झी मराठी वाहिनीवरील “देवमाणूस” ही मालिका दिवसेंदिवस चाहत्यांच्या मनात घर करत आहे. या मालिकेचा पहिलाच भाग हा टीआरपी वाढवणारा ठरला होता. देवीसिंहच्या मृत्युनंतर आता मालिकेत आणखी नवीन काय बरं घडणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. त्यामुळे ही मालिका सर्वांत उच्चतम टीआरपी गाठण्यात यशस्वी ठरत आहे. या मालिकेच्या पहिल्याच भागात ङॉ. देवीसिंगच्या स्मृतिप्रीत्यर्थ गावकऱ्यांनी ङिंपलच्या हस्ते ङॉक्टर च्या पुतळ्याचे अनावरण केले होते.

त्याचदरम्यान जैसलमेर येथे देवीसिंग नटवरलाल सिंगच्या भूमिकेत पाहायला मिळाला. तेथे तो आपली शक्कल लढवून हातचलाखी करून लोकांना त्यांचे पैसे ङबल करून देतो. तेथेच एक फॉरेनर सुद्धा उभी असते. त्यावेळी आपल्या जवळची नोट नटवरलालला देऊन ती नोट ङबल करून दाखवण्यास सांगते. त्यानंतर परदेशी चलनातील ती नोट पाहून नटवरलाल अतिशय बुचकळ्यात पडतो. पण काही वेळातच तो ती नोट देखील ङबल करून दाखवतो. त्याची ही जादू पाहून परदेशी महिला ङॉक्टर च्या मागे लागते आणि मला सुद्धा ही जादू शिकव, असे म्हणते. त्याबदल्यात मी तुला भरपूर पैसे देईल, असे ती सांगते.

See also  रोमॅंटिक सीन देताना अभिनेता धर्मेंद्र यांना घाबरून फुटायचा घाम, या अभिनेत्रीने केला खुलासा...

267626328 2740479412922644 843012266027778031 n

मात्र नंतर त्या फॉरेनरचा मृत्यु होतो. तेव्हा त्या फॉरेनरचा मृत्यु ङॉक्टरनेच घडवून आणला, अशी प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू होऊ लागते. ही फॉरेनर नेमकी कोण बरं…? तिचं नाव काय?? याविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील उत्सुक आहात ना. “देवमाणूस 2” मालिकेत सुरूवातीलाच पाहायला मिळालेल्या या अभिनेत्रीचे नाव “एलेना वेल्टर” आहे. एलेना ही मूळची जर्मनची असून भारतातील कित्येक ठिकाणी ती ट्रॅव्हल करताना दिसते.

यापूर्वी देखील तिने काही जाहिरातीत काम केले आहे. यामध्ये रेजेंन्सी धर्मशाळा रिसॉर्ट च्या काही जाहिरातीत ती पाहायला मिळाली होती. परंतु “देवमाणूस 2” या मालिकेतून ती पहिल्यांदाच अभिनय करताना दिसत आहे. एलेना वेल्टर ही अभिनय आणि जाहीरातींव्यतिरिक्त सामाजिक कार्य सुद्धा पार पाडताना दिसते. अनेक एनजीओंना तिने मदत केलेली आहे. त्याचप्रमाणे तिने शाळांमध्ये लेक्चर्स सुद्धा दिले आहेत.

See also  अभिनेत्री श्रुती मराठेचे पावसातील फोटो सोशल मीडियावर होत आहे खूपच व्हायरल...

243111474 568521847718228 5601662612349523817 n

देवमाणूस मालिकेचा पहिला भाग चाहत्यांच्या विशेष पसंतीत उतरला होता. याच कारणामुळे तर या मालिकेचा दुसरा भाग सुद्धा प्रदर्शित होत आहे. सत्य घटनेवर आधारित ही मालिका असल्याने प्रेक्षकांनी या मालिकेला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे. ही मालिका पुढे देखील अशीच वाटचाल करत राहो, त्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment