अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरून थेट महेश टिळेकरांशी वाद घालणारा हा आरोह वेलणकर, नेमका आहे तरी कोण कोण?

महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांच्या नवीन गाण्यावर टि’प्प’णी केली. त्यावरुन महेश टिळेकर आणि अभिनेता आरोह वेलणकर यांच्यात फेसबुकवर वा’द सुरू आहे. एकीकडे स्त्री शक्ती, सन्मानाच्या गोष्टी करता आणि दुसरीकडे ही कसली भाषा? तुमची टी’का वाचून ला’ज वाटली” असे आरोहने म्हटले आहे.तुमच्या मराठी तारका या कार्यक्रमात कोण काम करतंय बघू”, असं आरोहने फेसबुकवर लिहिलंय.

तर, आरोहची ही पोस्ट पाहून महेश टिळेकर पुन्हा सं’त’पाले आहेत. त्यांनीही आरोहला उत्तर देत रागाच्या भरात पुन्हा पोस्ट शेअर केली आहे.  ” बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला ध’म’की वजा संदेश देतोय,तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथ, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू ध’म’की देऊन मला सांगतोय.

aroh welankar and mahesh tilekar

कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार.. आधी स्वतः चे करिअर बघ. असा प्रतिटोला लगावला आहे. थेट महेश टिळेकरांशी वा’द घालणारा हा आरोह वेलणकर कोण आहे ? ते जाणून घेऊया.

एकांकिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या बक्षिसाने थेट चित्रपटातच एन्ट्री केली. आणि वाट्याला आलेला रोलही असा टाकला की, चित्रपट रसिकांची मनेही जिंकली. रंगभूमीवरील एकांकिका ते थेट ‘रेगे’ चित्रपटातील डॉ. अनिरुद्ध रेगे ची लक्षवेधी भूमिका साकारणारा हा तरुण कलाकार म्हणजे आरोह वेलणकर. आता पुन्हा एकदा तो ‘डॉक्टर’च्या भूमिकेत या मालिकाविश्वात प्रथमच पदार्पण करत प्रेक्षकांसमोर आला आहे. झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील ‘लाडाची मी लेक गं’ या नव्या मालिकेत डॉ. सौरभ साटम या नायकाची भूमिका तो साकारतो आहे.

पुण्याच्या एमआयटी मधे इंजिनीअरिंग करत असतानाच एकांकिकेच्या माध्यमातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तो करत असलेल्या ‘पेज नॉट फाऊंड’ या एकांकिकेतील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनयाची महाराष्ट्रातील बहुतेक सर्व मानाची पारितोषिके मिळाली.

mahesh aroh

परिणामस्वरूप, २०१२ साली थेट ‘रेगे’ या चित्रपटासाठी त्याला विचारणा झाली आणि अर्थातच त्याने होकार दिला. सुदैवाने उत्तम लेखन-दिग्दर्शन असलेला हा चित्रपट नशीबात आला. ‘रेगे’ चित्रपटाने त्याला मार्ग दाखवला, ओळख मिळवून दिली, आणि त्यामुळे मग त्याने या क्षेत्रातच करिअर करण्याचे निश्चित केले.’

दैनंदिन मालिका हे असे माध्यम आहे की, ज्याच्या माध्यमातून कोणताही कलाकार लोकांच्या घरातच काय अगदी मनांतही स्थान मिळवू शकतो. एकांकिका, नाटक, चित्रपटानंतर आता छोट्या पडद्यावरील मालिकांमधे भूमिका करण्याची आरोहची इच्छा ‘लाडाची मी लेक गं’ च्या माध्यमातून पूर्ण झाली आहे.

‘कोणत्याही गोष्टीचा घेतलेला पहिला अनुभव हा संस्मरणीयच असतो. प्रसार माध्यमाविषयी त्याला प्रचंड आदर आहे. छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी तो फक्त योग्य संधीची वाट पाहत होता. ‘लाडाची मी लेक गं’ च्या निमित्ताने ती मिळाली, आणि त्यातही लीड रोल.

छोट्या पडद्यावरील मालिका या दीर्घकाळ सुरू राहात असल्यामुळे मालिकेतील कलाकारांना भूमिकेतील ‘सातत्य’ जपण्यासाठी आपले शरीर, चेहरा यावर कठोर मेहनत घ्यावी लागते, त्यासाठी त्याने नियमित व्यायाम आणि सुयोग्य आहार यांची सांगड घातली आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या कार्यक्रमातही तो अल्पकाळ झळकला होता.

त्या अल्प काळातही त्याने रसिकांची वाहवा मिळविली होती. रेगे’ या चित्रपटानंतर आरोहने जवळपास पाच चित्रपटांमध्ये अभिनय केला. त्यातील बरेचसे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. नाट्यदिग्दर्शन व लेखनातही आरोह विशेष पारंगत आहे. सध्या नव्या कलाकारांचा वेबसिरीजकडे अधिक कल दिसून येतो आहे. त्यामुळे सध्या त्याचे एका वेबसिरीज चे लेखन सुरू आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment