2 वेळा महापौर होऊन थेट केंद्रीय मंत्री झालेले डॉ. भागवत कराड नेमके आहेत कोण?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

2 दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात महाराष्ट्रातील 4 नेत्यांना संधी देण्यात आली. यातील 3 नेते महाराष्ट्राला परिचित होते मात्र डॉ. भागवत कराड हे नेमके कोण आहेत. त्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान का आणि कसे दिले गेले याच्या चर्चा सुरू झाल्या.

जेव्हा डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची खासदारकी दिली होती, तेव्हाही महाराष्ट्रात पंकजा मुंडे यांना पर्याय म्हणून कराड यांना पुढे केल्याची चर्चा रंगली होती. राज्यसभेची खासदारकीपर्यंत कराड यांनी मारलेली मजल हा मोठा विषय ठरत असताना आता त्यांना थेट केंद्रात मंत्रिपद ही भविष्यात येणाऱ्या अनेक मोठ्या धक्क्यांची ठिणगी असल्याचे समजते आहे.

कोण आहेत डॉ. भागवत कराड :- स्व. गोपीनाथ मुंडे यांनी कराड यांना राजकारणात आणलं. पेशाने डॉक्टर असलेले कराड हे आजवर 2 वेळा औरंगाबाद महापालिकेचे महापौर राहिलेले आहेत. ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे स्वतंत्र संचालकही होते. यापलिकडे त्यांनी राजकारणात विशेष मजल मारलेली नाही.

See also  अरेच्चा! अजय देवगण सोबत लग्न करण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात वेडी झाली होती काजोल, अजयला कळल्यानंतर...

कराड यांची राजकीय ताकद :- कराड यांची भविष्यात वंजारी समाजाचे किंवा ओबीसी नेते अशी ओळख निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांचे औरंगाबादकर कार्यकर्ते सांगतात. मात्र त्यांचा ओबीसी आणि वंजारी समाजावर अजिबात प्रभाव नसल्याचे स्पष्टपणे दिसून येते. एवढेच नाहीतर आजवर त्यांचा समाजात विशेष वावरही नव्हता. यापलीकडे जाऊन मुंडे भगिनींना नाकारून वंजारी समाज कराड यांना स्वीकारण्याची शक्यता अजिबातच नाही.

कशी आहे त्यांची राजकीय स्थिती :- त्यांना खासदारकी मिळाल्याने भाजपचे अंतर्गत राजकारण पेटले होते. पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते म्हणवले जाणारे कराड यांची थेट राज्यसभेत वर्णी लागली होती. त्यावेळी मुंडे समर्थक आक्रमक झाले होते कारण पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यावर त्यांना राज्यसभेत संधी दिली जाण्याची शक्यता होती. मात्र तिथे कराड यांना संधी मिळाली. भाजपमध्ये मुंडेंच्या विरुद्ध सक्रिय असणाऱ्या गटाने कराड यांना पुढे करून राज्यसभा मिळवून दिली तसेच आता मंत्रिपद मिळवून देण्यातही त्यांचा वाटा असल्याचे बोलले जाते.

See also  सार्वजनिक ठिकाणी आपल्या बॉयफ्रेंडला का'न'शिलात लगावली होती या प्रसिद्ध अभिनेत्रींनी, या अभिनेत्रीने तर...

खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळण्याचा चर्चा गेल्या महिनाभर चालू होत्या. मात्र अचानकपणे कराड यांना मंत्रिपद दिले गेल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याचे सांगितलं जातं आहे. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली नसली तरी त्यांचे कार्यकर्ते मात्र प्रचंड आक्रमक झालेले आहेत. दोन्ही बहिणींना संधी मिळण्याची जिथे जिथे शक्यता होती, तिथे तिथे भागवत कराड यांना संधी दिली गेली आहे.

का आणि कसे झाले केंद्रीय मंत्री :-

  • सध्या ओबीसी आरक्षण हा मुद्दा देशभरात चर्चेत आहे. ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारा चेहरा म्हणून कराड यांना संधी दिली असावी.
  • पंकजा मुंडे यांना पर्याय उभा केला जात असल्याचा चर्चाही राजकिय गोटात आहेत. कदाचित भाजपचे अंतर्गत राजकारणाचा फायदाही कराड यांना झाला असावा.
  • प्रीतम मुंडे या खासदार आहेत आणि पंकजा मुंडे पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीत आहेत मग अजून एक पद त्याच घरात देणे शक्य नसावे.
  • महाराष्ट्रातून ज्या 4 नेत्यांना संधी दिलेली आहे. त्यापैकी 3 नेते हे मूळ भाजपचे नाहीत. मग किमान 1 तरी नेता मूळ भाजप निष्ठावंत असावा.
See also  प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही करणार आहे लग्न, जाणून घ्या कोण आहे नवरदेव?

राज्याच्या राजकारणात अचानक एन्ट्री मिळाली तशीच केंद्रीय मंत्रिमंडळात अचानक एन्ट्री मिळालेले नशीबवान मंत्री डॉ. भागवत कराड हे खरोखरच समाजहिताचे काम करतात की अंतर्गत राजकारणाचा हिस्सा बनतात, हे पाहणे भविष्यात औत्सुक्याचे ठरणार आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment