बालपणीच देहविक्रय व्यापारात ढकलली गेली, पुढे झाली मुंबई अं’ड’रवर्ल्डची राणी, कोण होती गंगूबाई काठियावाडी?
मित्रांनो!, सध्या सर्वत्र सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या “गंगुबाई काठियावाडी” या आगामी चित्रपटाविषयी चर्चा सुरू आहे. भन्साळी यांच्या चित्रपटांमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यांचे भव्यदिव्य आणि आलिशान सेटस. आलिया भट्ट ही गंगूबाई ‘काठियावाडी’ची प्रमुख भूमिका साकारत आहे.
या चित्रपटाची कहाणी म्हणजे सन १९६० च्या दशकातल्या गंगूबाई काठियावाडी या शक्तिशाली आणि वा’द’ग्र’स्त महिलेचे संघर्षमय आयुष्य. या गंगूबाईंना १९६०च्या दशकात ‘कमाठीपुरा भागात ‘मॅडम’ म्हटले जायचे.
१९६०-७० च्या दशकात मुंबईत सक्रिय असणाऱ्या मा’फि’यां’बद्दल अतिशय अभ्यासपूर्ण आणि विस्तृत लिखाण करणारे सुप्रसिद्ध लेखक एस. हुसेन जैदीचे तुफान लोकप्रिय आणि प्रचंड खप असणारे पुस्तक “मा’फि’या क्वीन्स ऑफ मुंबई” (Mafia Queens Of Mumbai) या पुस्तकातून या गंगूबाईची कहाणी या चित्रपटासाठी घेण्यात आलेली आहे. ही “मॅडम” गंगूबाई कोण होती आणि इतक्या प्रसिद्धीच्या झोतात ती कशी आली? याच गंगूबाईची संघर्षमय आणि रंजक कथा या लेखात थोडक्यात जी पुढे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेच.
असे म्हटले जाते की, ही गंगूबाई गुजरातच्या काठियावाड भागातील नामांकित वकिलाच्या खानदानातील होती. अगदी लहान वयातच ती तिच्या प्रियकरासह घराबाहेर पळून गेली. गंगूचा प्रियकर हा तिच्या वडिलांकडे मुन्शी/कारकून म्हणून काम करायचा. तिथेच प्रेम जुळले आणि ते दोघे पळून थेट मुंबईत आले. थोड्याच दिवसांत गंगूच्या या प्रियकराने तीला कमाठीपुराच्या रे’ड ला’ई’ट ए’रि’या’मध्ये ढकलले.
गंगू आता दे’ह’वि’क्र’य व्यापाराचा एक भाग झाली. गंगूला फिल्मी हिरोईन होऊन स्वत:ला मोठ्या पडद्यावर पहायचं होतं, तिला अभिनेत्री व्हायचं होतं. तथापि, नशिबाने तिला देहविक्रय व्यापारात ढकलले. पण, ती पेटून उठली, ल’ढ’ली, सं’घ’र्ष केला आणि अल्पावधीतच तिच्या डोक्यावर थेट मुंबईच्या माफिया क्वीनचा मुकुट होता.
गंगूच्या आयुष्यातील चढ-उतारानंतर तिचा हळूहळू अं’ड’र’व’र्ल्ड’शी त्याचा संबंध वाढला आणि सोबतच तीची शक्तीही. ख’त’र’ना’क मा’फि’या डॉन करीम लालाने तिला आपली राखी बहीण बनविले आणि तेव्हापासून तीच्या जीवनाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. ती बनली कमाठीपुऱ्याची राणी. तेव्हापासून गंगूबाईंनी कामठीपुरा भागातील अनेक वे’श्या’गृ’ह विकत घेतले आणि तिचा द’ब’द’बा इतका वाढला की, लोकांनी तिला कमाठीपुऱ्याची “मॅडम” म्हणायला सुरवात केली.
तिच्याकडे त्या काळी जगातील सर्वात महागडी समजली जाणारी अशी काळ्या रंगाची आलिशान बेंटली कार होती. यावरुन तिच्याकडे असणाऱ्या संपत्तीचा अंदाज लावता येईल. गंगूबाईची ओळख तिच्या महागड्या मनगटी घड्याळ, आलिशान कार्स कार इ. वरूनच नव्हे तर शुद्ध सोन्याची जरी बॉर्डर असलेली साडी आणि सोन्याचे बटण असलेले ब्लाऊज ही सुद्धा तिची ओळख बनली. अफाट संपत्ती, आणि जबरदस्त द’ह’श’त याची मालकीण होती ही गंगूबाई.
तिने आपल्या आयुष्यातील अनेक कठीण दिवस पाहिले आणि म्हणूनच तिला वेश्यांबद्दल सहानुभूती होती. ती कायमच त्यांच्या मदतीसाठी उभी राहिली आणि त्यांना मदत केली. तिचा असा विश्वास होता की स्त्रीने कोणतेही काम केले पाहिजे, तिचे शोषण करण्याचा कोणालाही अधिकार नाही. तिने त्या काळातही अनेक संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांसह महिला सबलीकरणासाठी भरीव काम केले.
तिचे सामाजिक प्रस्थ इतके वाढले होते की तिने या रे’ड ला’ई’ट भागात ( Red Light Area) राहणाऱ्या वेश्यांच्या द’य’नी’य परिस्थितीबद्दल बोलण्यासाठी भारताचे तात्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंची देखील भेट घेतली होती. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट येत्या ३० जुलै रोजी रिलीज होत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.