चित्रपट करण्यासाठी आमिर खान घेत नाही एकही रुपया; त्यामागील कारण ऐकून विश्वास बसणार नाही…
लगान, तारे जमीन पर, थ्री इडियटस अशा अनेक दर्जेदार चित्रपटांमुळे आमीर खान आपल्या लक्षात राहतो. त्याची भूमिका, चित्रपटात मंडळी जाणारी गोष्ट आणि विचार आपल्यावर प्रभाव टाकणारी असते. थ्री इडियटस बघून अनेक लोकांनी आपल्या नोकऱ्या सोडल्या आणि आपापल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्यास सुरु केले.
आमीरचे चित्रपट फक्त तात्पुरती प्रेरणा देत नाहीत तर कायमस्वरूपी प्रभाव टाकतात. म्हणूनच आमीरला मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणतात. मधल्या काळात छोट्या पडद्यावर येऊन त्याने ‘सत्यमेव जयते’ हा आगळावेगळा कार्यक्रम करत छोट्या पडद्यावरही आपली अमीट अशी छा’प उमटवली.
दुसऱ्यांच्या आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवणारा आमीर खान खऱ्या आयुष्यात तितकाच प्रामाणिक आहे का? याचा कधी तुम्ही विचार केला आहे? सध्याचे जग पैसा म्हणजे यश समजणारे आहे. अर्थात त्यात काही गैर नाही. कारण आजच्या आणि आधीच्या पिढीच्या म्हणण्यानुसार ‘कामयाबी मतलब पैसा’.
आमीरच्या ‘थ्री इडियटस’ चित्रपटात एक डायलॉग आहे. ‘कामयाबी(पैसा) के पिछे मत भागो, काबील बनो काबील, कामयाबी झक मा’र के पीछे आयेगी’. हाच आमीर काबील आहे का? तर आहे मात्र पैशांविषयी त्याचा काय दृष्टीकोन आहे, हे जाणून घेणे महत्वाचे आहे. नाहीतर ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण’ अशी त्याची गत व्हायची.
आज आम्ही तुम्हाला आमीरची एक अशी गोष्ट सांगणार आहोत, जी गोष्ट ऐकून तुम्ही आमीरचे नक्कीच चाहते व्हाल. चित्रपट बनविण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतावा लागतो. त्यानंतर चित्रपट यशस्वी होतो की अयशस्वी होतो त्यावर यश-अपयश अवलंबून असते. सलग 2-4 सिनेमे अयशस्वी झाल्याने अनेक निर्मात्यांनी थेट आ’त्म्ह’त्ये’सारखे पाऊल उचलल्याच्या घ’ट’ना याच सिनेसृष्टीत घ’ड’ल्या आहेत.
कोट्यावधी रुपये लावून एखादा चित्रपट बनवला जातो. कलाकार,तंत्रज्ञ आणि इतर मंडळी आपापले पैसे घेऊन मोकळे होतात. चित्रपट नाही चालला तर निर्मात्यांची अवस्था कठीण होऊन जाते. याच काळात प्रत्येक निर्मात्याला आठवण येते ती आमीरची….
आमीर सिनेसृष्टीतील एकमेव असा ‘अभिनेता’ आहे जो चित्रपट करण्यासाठी एक रुपयाही घेत नाही. जाणून आश्चर्य वाटले ना? होय हे खरे आहे. आमीर फिल्म बनवण्यासाठी एक फुटकी कवडीही घेत नाही. आमीरला याविषयी एके ठिकाणी विचारले असता त्यावर त्याने दिलेले उत्तर फार सुंदर होते. तो म्हणतो की, चित्रपट ही जेवढी निर्मात्याची जबाबदारी असते, तेवढीच माझीही असते.
जर फिल्म नाही चालली तर मी का पैसे घेऊ? मी त्या कलाकारांसारखा आहे, जे रस्त्यावर कला सादर करतात आणि शेवटी टोपी काढून सगळ्यांसमोर जातात आणि म्हणतात की, आमची कला आवडली असेल तर पैसे द्या. काही लोक देतात काही लोक नाही देत. माझी कला आवडली तर लोक माझ्या चित्रपटांना बघतील आणि चित्रपटाला पैसे मिळतील आणि तेव्हाच मी त्या पैशात भागीदार होईल. चित्रपट पडला तर निर्मात्याचे नुकसान होते. त्याने माझ्यावर ठेवलेला विश्वास पूर्ण करण्यास मी अयशस्वी झालेलो असतो. मग मी अयशस्वी झाल्यावर पैसे का घ्यायचे?
मग आमीर फुकट काम करतो का? असे असेल तर मग त्याची रोजीरोटी कशी चालते? हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल.
जेव्हा आमीर एखाद्या चित्रपटात काम करतो, चित्रपट पूर्ण झाल्यावर आणि रिलीज झाल्यावर काही रक्कम जमा होते. ज्याला आपण ‘बॉक्सऑफिसचा गल्ला’ म्हणतो. सर्वांचे पैसे देऊन झाल्यावर जे पैसे उरतात, त्यातील काही ठराविक रक्कम आमीर स्वतःसाठी घेतो. चित्रपट आपटला आणि नुकसान झाले तर आमीर त्या चित्रपटाच्या निर्मात्याकडून एक रुपयाही घेत नाही.
कोट्यावधी रुपये लावून मोठी रि’स्क घेणाऱ्या निर्मात्यांना आमीर हा देवाप्रमाणे भासतो. कारण या ‘पैसा हा देव’ मानणाऱ्या जगात आणि त्यातल्या त्यात फिल्म इंडस्ट्रीत असे लोक शोधूनही सापडत नाहीत. आणि आमीरची हीच गोष्ट आपले सर्वांचे मन जिंकून घेणारी आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.