अभिनेता शाहरुख खान सोबत तब्बल 31 वर्षात अजय देवगणने एकदा ही केले नाही काम, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

१९९० च्या दशकात शाहरुख आणि काजोलची जोडी बॉलिवूडमधली सर्वात ब्लॉकबस्टर जोडी होती. ज्या ज्या वेळी ही जोडी चित्रपटात एकत्र आली. त्या त्या वेळी त्यांनी रुपेरी पडदा गाजवला.

शाहरुख आणि काजोल यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जितकी चांगली आहे तितकीच घट्ट मैत्री त्यांची व्यक्तिगत जीवनात सुद्धा आहे. आजही शाहरुख आणि काजोल एकमेकांचे खूप घनिष्ट मित्र आहेत आणि त्यांची मैत्री गेल्या २५ वर्षांपासून तशीच कायम आहे. यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे काजोलचा पती अजय देवगण आणि जिवलग मित्र शाहरुख खान या दोघांमध्ये मात्र तशी खास काही मैत्री नाही.

अगदी सुरुवातीपासूनच शाहरुख खान आणि अजय देवगण ह्यांच्यामध्ये मैत्री नव्हती असे नाहीय. एकेकाळी हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते. पण मग नंतर असे काही घडले की दोघांची मैत्री तुटून दुरावा निर्माण झाला. तर त्याचे असे झाले की…

सुप्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक राकेश रोशन हे १९९५ साली ‘करण अर्जुन’ या चित्रपटा साठी दोन हिरोच्या शोधात होते. ‘करण अर्जुन’ चित्रपटासाठी मेन हिरो म्हणून राकेश रोशन यांनी सुरुवातीला सनी देओल आणि अजय देवगण यांना घेतले होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव सनी देओलने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

See also  मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवल्याने शरीराचे होते खूप मोठे नुकसान, जाणून घ्या सविस्तर!

50184822

त्यानंतर राकेश रोशन यांनी शाहरुख खानला रोलसाठी विचारले तर तो तयार झाला. आणि मग अजय देवगण व शाहरुख खान या दोघांना चित्रपटासाठी फायनल केले गेले. आता परत अडचण अशी आली की, करणअर्जुन ची कथा ऐकल्यानंतर अजय देवगणला वाटले की या टाईप च्या भूमिका त्याने इतर चित्रपटात साकारल्या आहेत.

त्यामुळे त्याने राकेश रोशन यांना विनंती केली की, दोघांच्या भूमिकेची अदलाबदल करा. म्हणजेच चित्रपटात जी भूमिका शाहरुखला दिलेली होती ती अजय देवगण करेल आणि अजयची भूमिका शाहरुख करेल. परंतु निर्माते दिग्दर्शक राकेश रोशन गोष्टीसाठी तयार नव्हते. दरम्यानच्या काळात शाहरुख खान आणि राकेश रोशन यांच्यात सुद्धा काही गोष्टींवरून खटके उडू लागले.

SRK ajay

शेवटी शाहरुख आणि अजय देवगण या दोघांनी करण अर्जुन फिल्म संबंधी निर्णय घेण्यासाठी एक मिटिंग घेतली. मीटिंगमध्ये दोघांनी फायनल निर्णय घेतला की, दोघांनीही एकत्रच हा चित्रपट सोडायचा. अजय देवगणने त्यानंतर लगेच ‘करण अर्जुन’ चित्रपट सोडला सुद्धा.

See also  उडत्या विमान्याला धडकल्या ३ विजा, आणि नंतर... पुढे काय झाले? तुम्हीच पहा हा विडिओ!

परंतु एक महिन्यानंतर त्याला समजले की, “मी सुद्धा तुझ्यासोबत हा चित्रपट सोडणार”, असे दोस्तीचे वचन दिलेल्या शाहरुखने मात्र हा चित्रपट सोडलाच नाही. तो अजूनही चित्रपटात आहे आणि अजयला जो रोल हवा होता तो रोलही शाहरुख करतोय. त्या वेळेस अजय देवगणची जी “सटकली” ती आजही कायम आहे.

ajay srk kajol 7598

हेच ते कारण आहे, ज्यामुळे शाहरुख आणि अजय देवगण जवळजवळ ३१ वर्ष बॉलिवूडमध्ये आहेत पण आजवर कोणत्याच चित्रपटात सोबत दिसले नाहीत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काजोल दोघांसाठी खास आहे. पण असे असूनही त्या दोघांमधील दुरावा कायम आहे. काजोलही कधी या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही.

या नंतरही २०१२ साली अजय देवगणचा चित्रपट ‘सन ऑफ सरदार’ ज्या दिवशी रिलीज होत होता. अगदी त्याच दिवशी शाहरुखचा ‘जब तक है जान’ हा चित्रपट रिलीज झाला. यशराजने आपली प्रतिष्ठा आणि पावर ह्यांचा उपयोग करून शाहरुखच्या ‘जब तक है जान’ चित्रपटासाठी जास्त स्क्रीन्स विकत घेतले.

See also  काजोलने शेयर केले आपल्या सक्सेसफुल करियर मागील सिक्रेट, हे ऐकून तर तुम्ही देखील थक्क व्हाल!

BeFunky collage 15

ज्यामुळे त्याच्या ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटाला जास्त स्क्रीन्स मिळू शकले नाही. ज्यामुळे चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहचू शकला नाही. असे अजय देवगणचे म्हणणे होते. २०१६ ला सुद्धा शाहरुखच्या ‘ए दिल है मुश्किल’ चित्रपटाच्या रिलीजच्याच दिवशी अजय देवगणचा ‘शिवाय’ चित्रपट रिलीज झाला होता. अजूनही या दोघांमधील हा दुरावा कायम आहेच…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment