या कारणामुळे अभिनेता अक्षय खन्ना अजूनही आहे ‘अविवाहित’, त्याच्या भूतकाळात घडले होते असे काही कि…

“इच्छा होती माझ्या मनीची, साथ हवी होती तुझी क्षणोक्षणीची” मित्रांनो आयुष्यात प्रत्येक व्यक्ती ही एकदा का होईना, पण प्रेमात पङतेच. आपल्याला वाटते की, ज्या व्यक्तीवर आपले प्रेम आहे, त्याच व्यक्तीसोबत आयुष्यभर एकत्र राहावेसे वाटते. परंतु शेवटी नियती समोर कुणाचेही काही चालत नाही. असेच काहीसे बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेतील या कपल सोबत देखील झाले.

62957194

इंडस्ट्रीमध्ये “विनोद खन्ना” या सुपरस्टार अभिनेत्याचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. त्यांचा मुलगा अक्षय खन्ना याने देखील अभिनयाचे कौशल्य आपल्या वडिलांकडूनच शिकले आहे. पण त्याने आपल्या वडिलांच्या नावाचा वापर न करता इंङस्टीमध्ये स्वतःची अशी एक वेगळीच ओळख बनवली आहे.

“दिल चाहता है”, “रेस”, “ताल” यांसारख्या चित्रपटातून त्याच्या अभिनयाचे कौतुक देखील करण्यात आले आहे. एवढे दिमाखदार व्यक्तिमत्त्व असूनही तो अजूनही ‘अविवाहित’ का बरं आहे, असे प्रश्न त्याच्या अनेक चाहत्यांना नेहमीच सतावतात. तर आज आम्ही तुम्हांला हेच टॉप सिक्रेट सांगणार आहोत.

See also  दिव्या भरतीच्या मृत्यूचे श्रीदेवी होते असे कनेक्शन, लाडला चित्रपटाच्या दरम्यान घडली होती विचित्र घटना!

Akshaye Khanna auditioned for this role in the Sanjay Dutt biopic

अक्षय खन्ना याने “हमराज” या चित्रपटात अतिशय उत्तम प्रकारे ‘नकारात्मक’ व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच्या या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेयर मध्ये उत्कृष्ट नामांकन सुद्धा मिळाले होते. तसेच ‘रेस’ या चित्रपटात त्याने सैफ अली खानच्या भावाची भूमिका साकारली होती. जी लोकांना खूप आवडली होती.

मित्रांनो तो एक काळ होता, जेव्हा अक्षय खन्नाचे इंङस्टीमधील अनेक अभिनेत्रींसोबत रिलेशनशिप होते. त्याच्या गर्लफ्रेंडच्या लिस्टमध्ये करिश्मा कपूरचे नाव देखील सामील होते. “हलचल” चित्रपटानंतर करिश्मा आणि अक्षय यांचे अनेक किस्से समोर आले होते. पण त्यांच्या लग्नाची गोष्ट ही कपूर खानदानातील करिश्मा कपूर मुळेच समोर आली.

karismaandakshaye1 1585661044

रणधीर कपूर यांनी आपली मूलगी करिश्मा कपूर हिचे लग्न अक्षय खन्ना सोबत ठरवले होते. परंतु करिश्माची आई बबिता हिला हे रिलेशन अजिबात पसंत नव्हते. कारण त्यामुळे करिश्माच्या करियर वर काहीच परिणाम न व्हावा, अशी तिची इच्छा होती.

See also  अभिनेता अक्षय कुमारला या कारणामुळे येते अभिनेत्री दीपिका पादुकोणची दया, कारण...

इंङस्टीमधील टॉप अभिनेत्रींपैकी करिश्मा कपूर ही एक होती. ती आपल्या करियर मध्ये यशाची गरुङझेप घेत होती. लग्नामुळे तिने आपल्या करियरला ब्रेक घ्यावा, असे तिची आई बबिता हिला वाटत नव्हते. याच कारणामुळे त्यांनी लग्नास नकार दिला.

akshaye khanna jpg

अभिनेता अक्षय खन्ना याने आपल्या मुलाखतीत सांगितले होते की, त्याला तमिळनाडूच्या जयललिता ह्या खूपच आवडतात. मला त्यांना ङेट करायचे आहे. तर जयललिता मध्ये असलेल्या गोष्टी अक्षय खन्ना ला आकर्षित करतात, असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु अक्षय हा जयललिता पेक्षा 27 वर्षांनी लहान आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  "तुझ्यामुळे माझ्या आईचे प्राण वाचले" सोनू सुदच्या या याच्या कामगिरीचे कौतुक करावे तेवढे कमी...

Leave a Comment

close