पुष्पा सिनेमातील स्त्रीवल्ली या गाण्याचा मराठी वर्जन तुम्ही ऐकलात का हो, अमरावतीच्या पोरांची ही कमाल एकदा नक्कीच पाहा.

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

हल्ली जिकडे तिकडे “पुष्पा” चा दणका पाहायला मिळत आहे. मात्र त्याआधीच या चित्रपटातील सगळी गाणी हिट झाली होती. “पुष्पा द राइज” या चित्रपटातील सर्वांत गाजलेलं अप्रतिम गाणं म्हणजे सामी सामी. त्यानंतर समांथाच्या गाण्याने देखील सर्वत्र धूमाकळ घातला. परंतु आता या दोन्ही गाण्यांपेक्षा देखील अधिक क्रेज आहे ती स्त्रीवल्ली या गाण्याची. पुष्पा चित्रपटातील स्त्रीवल्ली या गाण्याने अगदी सर्वांनाच वेङ लावून ठेवले आहे. तेलुगु मध्ये तयार करण्यात आलेल्या पुष्पा या सिनेमाची गाणी ही मल्ल्याळम, तमिळ आणि हिंदी भाषांमध्येही करण्यात आली आहेत. मात्र स्त्रीवल्ली हे गाणं अगदी मराठीत सुद्धा एका व्यक्तीने साकारले आहे.

See also  "अरे देवा, ही तर नाइटी घालून आली.." करीना कपूरला पाहून चाहत्यांनी केले तिला ट्रोल...

थोडक्यात म्हणजे या गाण्याचे मराठी वर्जन ऐकून रसिकांनी देखील या गाण्याला प्रचंड दाद दिली आहे. विजय खंदारे नामक या व्यक्तीने हे गाणं आपल्या युट्यूब चॅनेलवर शेयर केलं आहे. अहो परंतु त्याने फक्त हे गाणं मराठीतून लिहिलं नाही तर त्याने ते व्हिडीओ च्या माध्यमातून साकारले आहे. एक सुंदर लवस्टोरी, मराठी स्त्रीवल्ली या गाण्यात पाहायला मिळते. हे गाणं पाहिल्यानंतर जणू काही हे मराठीतच सर्वांत आधी साकारल्याचा भास आपल्याला निश्चितच होतो.

कुणी बरं लढवली ही शक्कल :
विजय खंदारे याने एकंदरीत 3 मिनिट 44 सेकंदांचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्याने तयार केला. विजय खंदारे आणि तृप्ती खंदारे यांनी देखील या व्हिडिओमध्ये काम केले आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओचे निर्देशन सुद्धा विजय यांनीच केले आहे. त्याचसोबत गाणं लिहिण्याचे आणि गायनाचं काम सुद्धा त्यांनीच केले आहे. त्यांच्यासोबत राधिका नागरमोटे, सुहासिनी गुल्हाने, मनिष पतंग्रे, रोशन चौधरी यांनी या व्हिडिओमध्ये काम केले आहे. तर आंचल हिने कॅमेरा सांभाळण्याची जबाबदारी पार पाङली आहे.

See also  दुसरे लग्न करण्यासाठी आपल्या पत्नी सायरा बानोला दिलीपकुमार यांनी सोडले होते, त्यानंतर जे झाले ते...

अमरावतीतील श्रीनिवास या स्टुडिओ मध्ये स्त्रीवल्ली च्या या गाण्याचे शूटिंग करण्यात आले आहे. तर फक्त 12 दिवसांतच या गाण्याने तब्बल 700 व्ह्यूज मिळवले आहेत. तर 41 हजारहून अधिक लोकांनी या गाण्याला लाईक केले आहे. 29 ङिसेंबरला स्त्रीवल्ली या गाण्याचा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. विजय खंदारे यांचे हे नवीन गाणे बहुतेक लोकांना आवडले असल्याने ते कमेंट्स मध्ये देखील आपला आनंद व्यक्त करत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  'द कपिल शर्मा शो' मधील या प्रसिद्ध अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरदेवाचे नाव ऐकून थक्क व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment