…म्हणून ‘सूर्यवंशम’ हा चित्रपट सेट मॅक्सवर पुन्हा पुन्हा का दाखवला जातो, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…
खूप वेळेस तुम्ही सॅट मॅक्स आणि सोनी वर ‘सूर्यवंशम’ चित्रपट पहिला असेल, हे पाहिल्यानंतर तुमच्या मनात असा प्रश्न पडेल की, पुन्हा पुन्हा टीव्हीवर दिसणार्या या चित्रपटात असे काय आहे, कि हा चित्रपट पुन्हा पुन्हा दाखवला जातो.
तरी बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन यांचे चाहते हा चित्रपट खूप आनंदाने पुन्हा पुन्हा पाहतात. आजपर्यंतच्या बिग बी यांच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘सूर्यवंशम’ होय.
त्याचवेळी बर्याच लोकांनी टीव्ही चॅनेलवर हा चित्रपट वारंवार टीव्हीवर दाखविला जात असल्यामुळे खूप आरोप देखील केले आहेत. काही दिवसां अगोदरच बिग बी अमिताभ बच्चन यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले, तर चला जाणून घेऊया काय आहे या मागचे कारण…
अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ हा संस्मरणीय चित्रपट रिलीज होऊन 21 वर्षे झाली आहेत. 21 मे, 1999 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाबद्दल विनोद आणि मिम्स सर्वात जास्त बनले आहेत. खरं तर, याचे एक कारण टीव्हीवर हा चित्रपट वारंवार दाखवला जातो.
हा चित्रपट टीव्हीवर इतक्या वेळा आला आहे की आता लोक हीरा ठाकूर, राधा, गौरी, भानुप्रताप आणि मेजर रणजित यांचे नाव लोकांना पाठ झाले आहेत. आजही बर्याच लोकांना टीव्हीवर वारंवार हा चित्रपट का दाखविला जातो हे माहित नाही.
टीव्हीवर वारंवार ‘सूर्यवंशम’ दिसण्याचे कारण समोर आले आणि ते असे आहे कि 21 मे 1999 रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच वर्षी सोनी टीव्हीचा मॅक्स चॅनेल लाँच झाला होता. म्हणजे चित्रपट आणि चॅनेल दोन्ही एकाच वर्षी आले होते.
हा चित्रपट वारंवार दाखवण्याचे एक कारण असे देखील आहे की ज्या वाहिनीवर चित्रपट येतो म्हणजे सेट मॅक्स, त्यांनीया चित्रपटाचे १०० वर्षांचे राईट्स विकत घेतले आहेत. या कारणासाठी हा चित्रपट वारंवार जात जात आहे आणि तो २०९९ पर्यंत वारंवार दाखवला जाईल. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात दुहेरी भूमिका केली होती.
सूर्यवंशम हा भारतीय चित्रपट कोणत्याही वाहिनीवरील सर्वाधिक प्रसारित झालेला चित्रपट आहे. ग्रामीण भागातही या चित्रपटाला खूप पसंती मिळाली आहे. चित्रपटाला २१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वत: अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून या चित्रपटाचे कौतुक केले होते.
चित्रपटाची मुख्य अभिनेत्री सौंदर्या रघु (राधा) आता या जगात नाही. 17 एप्रिल 2004 रोजी सौंदर्या बंगळुरूजवळ विमान अ-प-घा-ता-त ठा-र झाली. सौंदर्या यांनी 1992 मध्ये ‘गंधर्व’ चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत प्रवेश केला होता.
सूर्यवंशम हा तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. यानंतर 1997 ते 2000 या काळात एकाच कथेवर चार चित्रपट बनले. यापूर्वी या चित्रपटात अमिताभ आणि अभिषेक बच्चन हे पिता-पुत्र जोडीची भूमिका करणार होते. परंतु, नंतर अमिताभ यांनी दुहेरी भूमिका केली.
सूर्यवंशमचे बजेट त्या काळात 7 कोटी रुपये होते, तर चित्रपटाने सुमारे 13 कोटी रुपये कमावले. रेखाने सूर्यवंशम, जयसुधा आणि सौंदर्या या दोन अभिनेत्रींसाठी आपला आवाज दिला होता.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.