लग्नाच्या अगोदर नवरदेव-नवरी हळद का लावतात? त्यामागील शास्त्रीय कारण ऐकून थक्क व्हाल!
“लग्नसोहळ्यांचा ढंग हा निराळाच, हळदी समारंभाचा रंग हा न्यारा”. लग्न म्हटले की सर्व विधी हे परंपरेनुसार पार पाडले जातात. त्यातील एक सर्वात महत्त्वपूर्ण सोहळा म्हणजे “हळदी समारंभ”. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये नवरा मुलगा व नवरी मुलगी यांना हळद लावण्याची एक विशेष परंपरा आहे.
हळदीने पिवळे करून मग नवऱ्या मूलीला सासरी पाठविले जाते. हळदी शिवाय लग्न हे अपूरेच मानले जाते. त्यामुळे हळदीचा सोहळा या जल्लोषात साजरा केला जातो. परंतु लग्नाच्या वेळी नवरा- नवरीला हळद का बरं लावली जाते? या परंपरेमागील महत्त्व नेमकं कोणतं, हे आपल्याला ठाऊकच नसतं. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हांला याबद्दलच सांगणार आहोत.
मित्रांनो आपल्याला माहित आहे, जुन्या काळात ब्यूटीपार्लर – सलून असे काही देखील उपलब्ध नव्हते. त्यामुळे नवरा- नवरी यांना सुंदर दिसण्यासाठी कोणतेही साधन नव्हते. यासाठी चेहऱ्यावरील रंग उजळण्यासाठी हळदीचा उपयोग केला जात असे.
कारण हळदीमध्ये प्राकृतिक एंटीसेपस्टिक आणि एंटीबॅक्टेरियल गुण आहेत. जी आपल्या त्वचेसाठी बहुउपयोगी असते. हळदीच्या उपयोगाने त्वचेचा रंग निखारतो व अधिकाधिक ग्लो येतो. कारण विवाह सोहळ्या मध्ये नवरा- नवरी हे खूप जास्त स्पेशल असतात.
यासाठी त्यांच्या चेहऱ्यावर विशेषकरून हळद लावण्यात येते. याशिवाय हात आणि पायांवरही हळद लावली जाते. यामुळे नवरा- नवरी यांचे सौंदर्य खुलून येते.
हळदीचे बहुमूल्य उपयोग कोणते बरं?
- हळद चेहऱ्यावर लावल्याने मुरूम व फोङयांच्या समस्या दूर होतात. तसेच चेहऱ्यावरील प्राकृतिक सौंदर्य देखील वाढते.
- आपल्या शरीराला एखादी ज’ख’म झाली असता, त्यावर हळद लावल्याने ताबडतोब आपली जखम बरी होते.
- हळदीचा उपयोग नियमितपणे केल्याने चेहऱ्यावरील मृत पेशी हळू- हळू बाहेर निघून जातात. ज्यामुळे त्वचेवरील रंग व निखार दिवसेंदिवस उजळतो.
- हळदीचा रंग पिवळा असतो. त्यामुळे आपल्या समाजात या रंगाला खूप मान दिला जातो.
- हळदीच्या या सुंदर रंगामुळे नवरा- नवरीला हळद लावली जाते. यामुळे त्यांच्या नवीन वैवाहिक जीवनात सुखांचा व आनंदाचा वर्षाव होतो.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.