श्री शिव शंकराच्या मंदिरात नंदी का असतो? का नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात भाविक? कारण ऐकून थक्क व्हाल!

Advertisement

भगवान श्रीशिवशंकराच्या मंदिरात प्रवेश करून गाभाऱ्यात जाण्यापूर्वी त्यांचे वाहन नंदीला आपण भेट देतो आणि मगच पुढे जातो. आपण मंदिरात बघितले असेल की भक्त महादेवाचे दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना करतात. भगवान श्रीशिवशंकराकडून आपले मनोरथ पूर्ण करून घेण्यासाठी हिंदू धर्म शास्त्रानुसार नंदी फार महत्त्वाचा समाजाला जातो.

कदाचित यावरूनच आपल्याकडे एखाद्या सरकारी, राजकीय, सामाजिक अथवा शैक्षणिक आशा कुठल्याही कार्यालया मधे एखाद्या मोठय़ा पदावरील अधिकारी व्यक्तीला भेटायला जाण्यापूर्वी त्या मोठय़ा व्यक्तीचा जो कोणी खासगी सचिव किंवा कोणी कनिष्ठ अधिकारी असतो त्याला सर्वप्रथम खूश करावे लागते.

Advertisement

“भगवान श्रीशिवशंकराच्या आशिर्वादासाठी आधी नंदीला खूश करावे लागते”, ही म्हण त्यावरूनच प्रचलित झाली असावी. पण, त्याचा नेमका अर्थ काय आहे? आणि नंदीचे महत्त्व काय आहे? हे जाणून घेऊ यात.

हिंदू धर्म शास्त्रानुसार यामागील मान्यता अशी आहे की, नंदी हा महादेवाच्या गणांमध्ये सर्वात प्रिय आहे. तसेच नंदी हे महादेवाचे वाहनही आहे. दर्शन घेतल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना केल्याने ती सरळ महादेवाला पोहोचते अशी मान्यता आहे. बहुतेक सर्वच काळ महादेव समाधिस्थ असतात असे मानले जाते.

See also  यंदा अश्या प्रकारे साजरे करा तुळशीचे लग्न, जाणून घ्या शुभ मुहूर्त, आख्यायिका, शास्त्रीय महत्व, विवाह विधी...
Advertisement

त्यांचे ध्यान भंग होऊ नये म्हणून अशा परिस्थितीत भक्त नंदीला आपली प्रार्थना सांगतात. नंदीच्या कानात प्रार्थना किंवा मनोकामना सांगितल्यानंतर यथावकाश योग्य वेळी नंदी ती श्रीशिवशकरांकडे पोहचविणार आणि आपले इच्छित मनोरथ पूर्ण होणार अशी भाविक भक्तांची मनोमन श्रद्धा असते.

नंदी प्रसंगी महादेवांचाच कान ठरतो. कान शब्द ऐकून ते मेंदूपर्यंत पर्यंत पोहोचवतो, नंतर मेंदू त्या शब्दांचा अर्थ आणि भावना समजून घेऊन कृती करतो. त्याप्रमाणे महादेव समाधीतून उठल्यावर, नंदी भक्तांची प्रार्थना, मनोकामना इ. त्यांच्यापर्यंत पोहचवतो आणि भक्तांच्या कर्मानुसार श्रीमहादेव त्यांना इच्छा फलप्राप्तीचे वरदान देऊन संतुष्ट करतात.

Advertisement

पौराणिक कथेनुसार श्रीलाद मुनी यांनी ब्रह्मचर्य अनुसरुन तपस्या करण्याचे ठरविले. त्यांचे वडील हे पाहून काळजीत पडले की, आपला वंश आता पुढे कसा चालणार? श्रीलादांना तर गृहस्थ आश्रम स्वीकारण्याची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी वंश वृद्धीसाठी भगवान शिव यांना तपश्चर्येने संतुष्ट केले आणि जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त पुत्राचे वरदान मिळवले .

See also  रात्रीच्या वेळी कुत्रे का भुंकतात? कारण ऐकून थक्क व्हाल!

श्रीलाद मुनींच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या महादेवांनी श्रीलादला असा पुत्र देण्याचे वरदान दिले. काही काळानंतर, जमीन नांगरताना श्रीलादला एक मूल सापडले. त्याचे नाव त्यांनी नंदी ठेवले. नंतर भगवान शिवांनी मित्र आणि वरुण या दोन मुनींना श्रीलाद मुनींच्या च्या आश्रमात पाठवले. त्यांनी नंदीला पाहून नंदी हा अल्पायुषी असल्याची भविष्यवाणी केली.

Advertisement

नंदीला जेव्हा हे कळले, तेव्हा नंदीने मृत्यू पासून मुक्ती मिळविण्यासाठी अरण्यात जाऊन भगवान शिवाचे ध्यान करण्यास सुरवात केली. भगवान शिव नंदीच्या कठोर तपाने प्रसन्न झाले आणि वरदान दिले की, वत्स नंदी तु मृत्यू आणि भय यांपासून मुक्त होऊन अजरामर झालाहेस. भगवान शंकरांनी नंदीला पार्वती मातेच्या मदतीने सर्व गण, गणेश आणि वेदांसमोर सर्व गणांचा अधिपती म्हणून अभिषेक केला. अशा प्रकारे नंदी नंदेश्वर झाले.

भगवान शंकर यांनी नंदीला वरदान दिले की इथून पुढे जिथे मी राहील, नंदीही तिथेच राहील. असे म्हणतात की तेव्हापासून प्रत्येक शिव मंदिरात नंदीची स्थापना केली जाते. जर नंदीच्या कानात मनोरथ सांगितले गेले तर ते नक्कीच ते भगवान शंकराकडे पोहचवितात.

See also  शरीरावर "या" भागावर तीळ असलेल्या व्यक्ती असतात खूपच नशीबवान व उच्चश्रीमंत, जाणून घ्या यामागील रहस्य
Advertisement

महत्वाचे : –

  • नंदीच्या कानात जेव्हा तुम्ही आपली इच्छा सांगता तेंव्हा ती इतर कुणीही ऐकणार नाही याची काळजी घ्या.
  • नंदीच्या कानात कधीही कुणाबद्दल कागळ्या, तक्रारी अथवा कुणाचेही अनिष्ट चिंतन करू नका. खोटे सांगू नका.

जर तुम्ही असे केले तर महादेव रागावून आणि तुमची इच्छा तुमच्यावरच उलटेल. लक्षात ठेवा, तुम्ही नंदीच्या कानात काहीही बोलण्यापूर्वी नंदीची पूजा करावी, यानंतर नंदीच्या उजव्या कानात पूर्ण विश्वासाने, भक्तिभावाने तुमची इच्छा सांगा. भगवान शिव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील.

Advertisement

शुभं भवतु:! (वरील माहिती ही हिंदू धर्म ग्रंथातून संकलित केलेली असून भारतीय संस्कृती, धर्म परंपरा व त्यामागील कारणे इ. माहिती सर्वांस व्हावी, हाच प्रांजळ हेतू. मानने न मानने हे व्यक्तिसापेक्ष आहे.. )

Advertisement

Leave a Comment

close