आरोपी कर्ज बुडवून लंडनलाच का पळतात तुम्हाला माहीत आहे का?

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

भारतात सध्या एक गोष्ट साधारण झालीय. करोडो रुपयांचा कर्ज घेणे आणि आयुष्य भर लंडनला जावून थाटात जगणे. अशा कर्ज बुडव्या व्यक्तिं सोबत अनेक गु*न्हे करणारे आरोपी देखील सामील आहेत. पण आजतागायत ही लोक कर्ज बुडवून लंडनलाच का पळ काढतात हे अनेकांना माहित नाहीय. आज आपण त्याच गोष्टी विषयी संपूर्ण माहिती जाणनार आहोत.

कर्ज बुडव्या व्यक्तिंमध्ये सर्वात पहिलं नाव येत ते किंग फिशर एअरलाईन्सच्या पुर्व उद्योगपती विजय माल्याचा. त्यानंतर दुसरे नाव येते ते हिय्रांचा बढा व्यापारी निरव मोदी याचे, यांसोबत आय.पी.एल सामन्याच्या गुन्ह्यात अडकलेला ललित मोदी याचे. या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे खुन,दरोडे करणारे देखील लंडनला पळाले आहेत. जसे की 1993 साली गुजरात बाँ*ब स्फो*ट प्रकरणातील आरोपी टायगर हनिफ तसेच टी- सिरीजचे निर्माते गुलशन कुमार खु*न प्रकरणातला आरोपी नदीम सैफी अशा अनेक गुन्हेगारांनी लंडनला सध्या ठाण मांडले आहे. या सर्लांचे पळून जाण्याचे मुख्य कारण म्हणजे. लंडन सरकार अशा गुन्हेगारांचे आनंदात स्वागत करते आणि बक्कळ पैसा घेवून लंडनला गेलेल्या आरोपींना प्रदिर्घ काळ राहण्याचा गोल्डन विसा देखील देते. ज्यामुळे हे आरोपी आरामात कोणतीही फिकीर न करता आयुष्य व्यतित करतात.

See also  फँड्री फेम शालू उर्फ अभिनेत्री राजेश्वरी पडली प्रेमात? व्हिडीओ शेयर करत व्यक्त केल्या तिने आपल्या भावना...
Advertisement

लंडन सरकार सर्वाधिक कर्ज घेवून येण्याय्रा गुन्हेगारांनी दोन मिलीयन पाऊंड गुंतवणूक करणाय्रांना विशेष सेक्यूरिटी देखील देते ज्यामुळे अशा भारतातून पळ काढणाय्रा आरोपींना लंडन सरकार नेहमी काही न काही कारण देवून त्यांना सुरक्षित करते. बक्कळ कर्ज घेवून लंडन सारख्या देशात गेल्यामुळे तेथील जि.डी.पी तसेच इकाॅनाॅमी मध्ये देखील वाढ होते. त्यामुळे लंडन कोणाला नाही म्हणू शकत नाही.

अलिकडेच एस बँक बंद झालेल्या प्रकरणात राणा कपूर व कुटूंब यांची मोठी चर्चा सुरू होती आणि आहे. राणा कपूरच्या मुलगी लंडनला पळ काढताना आढळून आली. वेळीच सावधगिरी बाळगल्याने लंडनला जाण्यापासून तिला रोखले गेले.

Advertisement

लंडनला पळून जाण्याच्या प्रकरणात फक्त भारतातीलच आरोपी नसून, अनेक देशातील आरोपी सामील आहेत. जसे की मागे पाकिस्तानचे पुर्व प्रधानमंत्री नवाझ शरिफ यांचा देखील समावेश आहे. अशा लोकांना भारताकडे सुपूर्द करण्याची मागणी केली असता. लंडनने 130 आरोपींपैकी फक्त मोजक्या काही चार-पाच जणांनाच सुपूर्द केला आहे.

See also  पेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे, ते कसे कार्य करते, त्याच्या पासून बचाव कसा करावा? जाणून घ्या एक क्लिकवर

बक्कळ पैसा पाहून सैरभैर झालेल्या या लोकांना वेळीच धडा शिकवणे गरजेचे असते. पण लंडन सरकारच्या नियमानुसार ते शक्य नाही आहे.

Advertisement

Leave a Comment

close