या कारणांमुळे मराठी कलाकारांना मिळतात नेहमी बॉलिवूडमध्ये नोकरासारख्या साध्या भूमिका…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

आपण मागील काही काळात अनेक बॉलिवूड सिनेमात मराठी कलाकारांना नोकराचीच किंवा छोट्याश्या भूमिका करताना पाहिलं असेल. तर नेहमी दुय्यम स्तराचीच मराठी मधील कलाकार यांना भूमिका का मिळते बरं ? याचा आपण कधी विचार केलात का ? होय तर यावर प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ ( ashok saraf ) यांनी परखड पणे मत मांडलेलं आहे. आता काय आहे ते मत चला खाली सविस्तर जाणून घेऊयात.

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृृष्टीतील एक मोठं नाव. आज ही आणि तेव्हाही. कारण त्यांच्या सिने करियर शिवाय मराठी सिनेमा अर्धवटच. एवढा मोठा नट आणि स्वभावाने माणूस. इतक्या वर्षांपासून अशोक सराफ (Ashok Saraf) हे गेली अनेक वर्षे सातत्यानं प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. पन्नाशी ओलांडून सत्तरी ला खेटले असले तरी अजूनही ते काही थांबलेले नाहीत. काम सतत चालू आहेत.

See also  पतीच्या आ'त्मह'त्येनंतर पहिल्यांदाच बोलली 'खुलता कळी खुलेना' मधील हि अभिनेत्री म्हणाली, 'हे आणि मागचं वर्ष...

66364262

त्यांच्या अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणा-या अशोक मामा यांनी अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं. बॉलिवूडमध्येही त्यांनी काही सिनेमे केलेत. अर्थात बॉलिवूडमध्ये ते फार रमले नाहीत, याचं कारण त्यांनी सांगितलं. जे खूप परखड आहे.

बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांच्या वाट्याला बहुतांश दुय्यम भूमिकाच येतात? यामागचंही कारण यानिमित्तानं अशोक सराफ यांनी सांगितलं. सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी खास मुलाखत दिली. या मुलाखतीत अशोक सराफ यांनी आपल्या कारकिर्दीबद्दलच्या अनेक गोष्टी सांगितल्या. ज्यात त्यांनी बॉलिवूड मध्ये दुय्यम भूमिका मिळतात यापासून ते पांडू हवालदार मधील दादा कोंडके सोबतच काम आणि त्यानंतर चा सिने अभिनय यावर दिलखुलास चर्चा केली.

1609756036758 compressed e1610028055513

अशोक सराफ यांनी मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये दुय्यम भूमिकाच का मिळतात? यावर काय सांगितले परखड बघाच. मराठी कलाकारांना बॉलिवूडमध्ये दुय्यम भूमिकाच का मिळतात? असा प्रश्न एका चाहत्यानं त्यांना विचारला. यावर अशोक सराफ यांनी दिलेलं उत्तर लक्षवेधी ठरलं. ते म्हणाले, ‘मराठी चित्रपटसृष्टीत हिरोला चेहराच नाहीये. त्याला काम आहे. हिंदीत वेगळं आहे. हिंदींत आधी चेहरा बघतात. मराठी प्रेक्षक मराठी कलाकारांचा चेहरा बघत नाही, ते त्याच्या कामावर प्रेम करतात.

See also  अभिनेत्री किशोरी शहाणे यांचा पती आहे बॉलीवुडमधील प्रसिद्ध व्यक्ती, प्रेमविवाह करून थाटला सुखी संसार...

अशोक सराफ ( ashok saraf ) म्हणतात की तुम्ही चांगलं काम करत असाल तर तुम्ही आमचे हिरो, हा मराठी चित्रपटसृष्टीतील पूर्वापार नियम आहे. मराठी प्रेक्षक अधिक सुजाण आहे. हिंदीत चेहºयाला महत्त्व आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या हिरो या व्याख्येत बसतच नाही. त्यामुळं मराठी कलाकारांना नेहमीच नोकर किंवा तत्सम दुय्यम रोल दिले जातात. अर्थात नाना पाटेकर, स्मिता पाटील, अमोल पालेकर यांसारखे काही कलाकार त्याला अपवा’द आहेत. अनेक मराठी कलाकारांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक स्वतंत्र जागा निर्माण केली आहे. अनेक मराठी नावांचा बॉलिवूडमध्ये आजही दरारा आहे, असं अशोक सराफ म्हणाले.

untitled.ashoks55 202106642523

आणि त्यांचं म्हणणं खरं ही आहेच. पूर्वीच्या काळात तर साध्या सुध्या चेहऱ्याला एन्ट्री सुद्धा नव्हती बॉलिवूड मध्ये. पण आता फक्त अभिनय. म्हणून नवाज, इरफान आणि इतर सगळे आज आपलं अधिराज्य गाजवतायत.

See also  "अशी ही बनवाबनवी" चित्रपटातील शंतनुची पत्नी आहे ही प्रसिद्ध साऊथ अभिनेत्री, नाव ऐकून थक्क व्हाल!

अशोक सराफ यांनी सांगितले की म्हणून बॉलिवूडमध्ये रमलो नाही…हिंदीत माझा प्रवेश झाला तो अमोल पालेकरमुळे. त्यानं माझं नाव समोर केलं आणि मला ‘दामाद’ हा सिनेमा मिळाला. तिथून माझा बॉलिवूडमधला प्रवास सुरु झाला. पण बॉलिवूडमध्ये काम करण्यात मला फार रस नव्हताच. मराठी काम करण्याच समाधान मिळत होतं. मी काम करतोय ते लोकांना आवडतं, मग मी हिंदीत का काम करू? असा माझा विचार होता. त्यामुळं वेळ मिळाला तर मी हिंदी सिनेमा केला. हिंदी सिनेमांसाठी मी कधीच वेळ नाही काढला, असं त्यांनी सांगितलं.

अशोक मामा सारखा विनोदि बुद्धीने रसिकांना भुरळ घालणारा, प्रेम करणारा हसवणारा कलाकार खरच पुन्हा होणें नाही. मामा तुम्हाला तुमच्या उर्वरित भावी वाटचाली साठी खूप शुभेच्छा स्टार मराठी कडून

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment