या मोठ्या कारणामुळे राशीने अचानक सोडली होती ‘साथ निभाना साथिया’ मालिका, कारण ऐकून थक्क व्हाल!

टेलीविजन वरील स्टार प्लस या प्रसिद्ध चॅनेलवरील सिरीयल “साथ निभाना साथिया” या सीरियल मधील सर्वांची फेवरेट सुंदर आणि क्यूट अशी राशी मोदी या अभिनेत्रीला तुम्ही-आम्ही सर्वजण खूप मिस करत आहोत. राशी मोदी चा रिकामा कुकर गॅसवर चढवतानाचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे.

कुकर गॅसवर ठेवतानाचा हा सीन तर त्या सीरियल मधीलच आहे. परंतु त्या ङायलॉग ला अशाप्रकारे रॅप गाण्यासोबत जोडले गेले आहे की, सर्वजण या व्हिडिओचे फॅन बनताना दिसत आहेत. तसेच अनेक दिवसांनी या व्हिडिओच्या मार्फत आपली नौटंकी, मस्तीखोर राशी ही आपल्या समोर आली. त्यामुळे तिच्या गोड आठवणींना पुन्हा एकदा ओलावा मिळाला आहे.

5c5c10fe973a8e8bd00d38344956caee

“रसोङे में कौन था?” या ङायलॉग संबंधित अनेक मेम्स देखील बनवले जात आहेत. यावर प्रत्येक सेलिब्रिटी हा आपल्या- आपल्या परीने “रसोङे में कौन था?” याचे उत्तर देत व्हिडिओ वायरल करत आहेत. परंतु या व्हिडिओ मागील गुन्हेगार ही तर राशी मोदी म्हणजेच रूचा हसबिन्स हीच आहे.

राशीचा हा व्हिडीओ इन्स्टाग्राम वर शेयर होताच तो ताबडतोब व्हायरल होऊन लाखोंच्या पटीने शेयर होऊ लागला. तिच्या या पोस्ट वर अभिनेत्री अदा खान ने “राशी बेबी तुम ट्रेंङ कर रही हो” अशी कमेंट दिली. या वायरल व्हिडिओ मुळे पुन्हा एकदा रूचा हसबिन्स ही प्रसिद्धीमध्ये झळकत आहे.

READ  प्रसिद्ध बॉलीवूड सिंगर नेहा कक्करने केली या प्रसिद्ध बॉलिवूडच्या म्हाताऱ्या गीतकाराला एवढ्या लाखांची मदत...

rucha

राशीचा तो सुंदर मेकअप, तिच्या त्या काम चुकारपणाच्या नवनवीन आयडिया ती सिरीयल मध्ये नसूनही तिची कमी जाणवून देत आहे. परंतु सीरियल मध्ये राशीचा मृत्यू दाखवला त्यानंतर मात्र रूचा हसबिन्स पुन्हा कधीच दिसली नाही. मग सर्वांच्या हृदयाची तार छेङणारी राशी मोदी गेली तरी कुठे बरं? आता ती सध्या काय करते? कुठे आहे? असे कित्येक प्रश्न सर्वांना सतावत आहेत. मित्रांनो टेन्शन घेऊ नका.. आज आम्ही तुम्हांला हेच तर सगळे सांगणार आहोत.

तुम्हांला माहित आहे का? तुमच्या लाडक्या राशीचे म्हणजेच रूचा हसबिन्स चे लग्न देखील झाले आहे. इतकचं नव्हे तर तिला एक सुंदर, स्वीट अशी एक मुलगीही आहे. ती आता मातृत्व सुख अनुभवत अनुभवत आहे. रूचा हसबिन्स ही आपल्या छोट्याशा कुटुबांसोबत मुंबईतील ठाणे येथे राहते.

READ  मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवल्याने शरीराचे होते खूप मोठे नुकसान, जाणून घ्या सविस्तर!

alevs2iiy2rfww45 1598254810

मित्रांनो तुम्हांला ठाऊक आहे का? रूचा हसबिन्स ही एक त्या अभिनेत्रींपैकी आहे. जिने आपल्या परिवारासाठी एक सक्सेसफुल करियर सोङून दिले. 2014 मध्ये राशी मोदी ची भूमिका करणारा “साथ निभाना साथिया” या सीरियल मधून तिने रजा घेतली होती. त्याच दरम्यान ही सीरियल एक फेमस सीरियल म्हणून नावारूपास होती. तर रूचा हसबिन्स हिचे खूप जास्त फॅन्स देखील होते.

ऑक्टोंबर 2014 मध्ये रूचा हसबिन्स ने अचानकपणे आपली सिरियल सोडली. अभिनयाची दुनिया सोडल्यानंतर तिने आपला बॉयफ्रेंड राहुल जगदाळे यासोबतच 2014 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. राहुल जगदाळे सोबत साखरपुडा झाल्यानंतर रुचा ने मीडियाला आपल्या एका मुलाखतीत सांगितले की, “अभिनय करणे ही माझी आवङ आहे, गरज नाही.”

Rucha Hasabnis Husband

राहुल जगदाळे सोबत 2015 मध्ये रूचा हसबिन्स ने लग्नही केले. ती आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद अनुभवत आहे. आपल्या पतीसोबत ती परदेशात अनेक देशांमध्ये फिरायला देखील गेली आहे. आपल्या प्रेग्नेंसी दरम्यान ती पॅरिस मध्ये गेली होती. तिने तेथे आपले बेबीमुनचे फोटोशूटही केले.

READ  विराट-अनुष्काच्या लाडक्या मुलीला बॉलीवूड कलाकारांनी दिले इतके महागडे गिफ्ट, अभिनेता अक्षय कुमारने तर...

IndiaTv193afe rucha nach baliye7

रूचा हसबिन्स जेव्हा जेव्हा ट्रिपसाठी बाहेर जाते. तेव्हा ती तेथील फोटोज् आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट वर आवर्जून शेयर करते. ती आपल्या आई- वडिलांसोबत स्वित्झर्लंडला ही फिरून आली आहे. हल्लीच तिच्या वङीलांचे निधन झाले आहे. आपल्या लाडक्या बाबांना गमवायचे दुःख तिने सोशल मीडियावर शेयर केले होते.

सध्या वायरल होत असलेल्या “रसोङे में कौन था” या मेम्स वरून रुचा खूप प्रसिद्धीत आहे. त्यामुळे तिने “रसोङे में कौन था” या प्रश्नावर “रसोङे में मैं थीं” असे हास्यास्पद उत्तर देखील दिले आहे.

76091233

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment