वयाच्या 44 वर्षी देखील अविवाहित आहेत सैफ अली खानची बहीण, 2700 कोटींच्या संपत्तीची आहे मालकीण…
आपल्यापैकी अनेकांना हे कदाचित ठाऊक सुद्धा नसेल की, सोहा व्यतिरिक्त सैफ अली खानची दुसरी सख्खी बहीणही आहे. कारण ती कधीच नसते या झगमगत्या लाइमलाइटमध्ये. सध्या ती सांभाळतेय पतौडींची कोट्यवधींची संपत्ती. सबा पतौडी ही आता 42 वर्षांची असून अद्याप तिने लग्नही केलेले नाही. सबाने इतरांप्रमाणे अभिनय क्षेत्रात करिअर केले नाही, तर ती स्वतः एक उत्तम ज्वेलरी डिझायनर असून तिचा स्वतःचा बिझनेस आहे.
बॉलीवूड हिंदी चित्रपटसृष्टीत एक मानाचं आणि मोठ्या प्रतिष्ठेचे स्थान असलेले शाही कुटुंब म्हणजे पतौडी कुटुंब. हे कुटुंब सदैव प्रसिद्धीच्या झोतात असतं. पतौडी कुटुंबाशी संबधित कोणतीही गोष्ट असेल तर त्याची चर्चा फिल्म इंडस्ट्रीत आणि देशभरात नक्कीच होते.
या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर सा-यांच्या नजरा खिळलेल्या असतात शर्मिला टागौर त्यांचा मुलगा सैफ अली खान, मुलगी सोहा अली खान त्यानंतर सारा अली खान, सून करीना कपूर, नातू तैमूर इ. प्रत्येक व्यक्तींची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही.
पण शर्मिला टागौर यांना आणखीही एक मुलगी आहे हे मात्र अनेकांना ठाऊकच नाहीय. कारण ही सबा अली खान ही कधीच कोणत्याही चर्चेत नसते. बॉलीवूड ची झगमगती सिनेसृष्टी आणि पेज थ्री पार्टीजपासून कायम दूर राहणारी सबा अली खान ही आजच्या घडीला तब्बल 2700 कोटींची मालकिण आहे.
अत्यंत जवळचे असे काही मोजकेच फॅमिली फंक्शन वगळता सबा अली खान सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत नाही. सबा सिनेसृष्टीपासून कायमच लांब राहणे पसंत करते. सोहा प्रमाणेच सबाचेही वहीनी करिना कपूरसही चांगले बॉन्डींग आहे.
वहिनी करिनासाठी सबा नेहमीच ज्वेलरीचे नवनवीन डिझाइन करत असते. सबा ही सैफची लहान बहीण आहे. विशेष म्हणजे सबा सोशल मीडियावरही जास्त सक्रीय नसते. सोहा पेक्षाही सबा तिच्या बिझनेसमध्ये खूप व्यस्त असते.
मध्यंतरी काही काळ सोशल मीडियावर ती सक्रीय होती. पण ती तात्पुरतीच. त्यात तिने करिना तैमूरचा फोटो शेअर करत कौतुक केले होते. तसेच सारा अली खानचा भाऊ इब्राहिमचाही फोटो शेअर करत त्याचेही कौतुक करताना सबा दिसली होती.
कुटुंबाच्या सदस्यांचे फोटो शेअर करणारी सबा जास्त लाइमलाइटमध्ये कधी आली नाही. त्यामुळे सबाचा सोहाबरोबरचा फोटो पाहून चाहतेही संभ्रमात पडताना दिसत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.