विधवा सुनेचा सासू सासऱ्यांनी केला पुनर्विवाह, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

‘स्त्री’ चा जन्म हा चांगला की वाईट. असा प्रश्न बरेचदा तुम्हांला देखील पडतो का हो? खरं तर स्त्री ही एका नव्या पिढीला जन्म देते, ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. परंतु बरेचदा हीच स्त्री आपल्या समाजात सुरक्षित नसते. मित्रांनो आपणही ऐकले असेल, पुरातन काळापासून बालविवाह, सती जाणे, विधवेचं आयुष्य जगणे अशा अनेक जुनाट चालीरीती, परंपरा चालत आल्या आहेत.

यामुळे स्त्रियांचा जन्म म्हणजे पा’प असे देखील बरेचदा वाटते . परंतु 21 व्या शतकातील बदलती आधुनिक संस्कृती यामुळे स्त्रियांना थोडा दिलासा मिळत आहे. पुरातन काळापासून चालत आलेल्या या चालीरीतींचा नायनाट होत आहे. स्त्रीला देखील तिचे आयुष्य आनंदाने सर्व सुखांचा अनुभव घेत जगण्याचा पूर्ण हक्क आहे.

1588923667 ratlam mariage

मूलगी जेव्हा लग्न करून आपल्या माहेरहून सासरी जाते. तेव्हा तिला आयुष्यभर आपल्या पतीच्या घरी सुखाने संसार करणे, ही आपल्या समाजाची रीत आहे. परंतु काही कारणाने तिच्या पतीचा मृ’त्यु झाला, तर मात्र तिची सारी दुनियाच बेरंगीन होते. आयुष्यभराचा जोडीदार अर्धवट साथ सोडून जाण्याचे दुःख काय असते, हे तिच्याशिवाय दुसरे कुणीही समजू शकत नाही.

READ  पापमोचनी एकादशीचा अद्भुत योगायोग, जाणून घ्या या तिथीचे धार्मिक महत्व, शुभमुहूर्त व पूजाविधी सविस्तर...

आज आम्ही तुम्हांला अशीच एका स्त्रीची कहानी सांगणार आहोत. आपल्या मुलाचा मृ’त्यू झाल्यावर आपल्या सुनेच्या भविष्याचा विचार करून आई- वडिलांसमान या सासु- सासरयांनी आपल्या सूनेचे हात पिवळे करून तिला एक नवजीवन दिले. ही घटना मध्यप्रदेशातील रतलाम मधील आहे. तेथे सासु- सासरयांनी आपल्या वृद्ध जीवनाकङे पाहता आपल्या मूलीसारख्या सूनेचे संपूर्ण रीती- रीवाजांसह दुसर्‍यांदा लग्न लावून सासरी पाठवून दिले.

1588923502 ratlam mariage

तुम्हांला माहित आहे का? लॉ’क’ङा’ऊ’न काळात सर्व नियमांचे पालन करत हा पुनर्विवाह सोहळा संपन्न झाला आहे. संपूर्ण मध्यप्रदेश राज्यात यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. काटजू नगरातील रहिवासी 65 वर्षीय सरला जैन यांचा पुत्र मोहित जैन याचे आष्टा मधील निवासी सोनम सोबत 6 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नाच्या 3 वर्षांनंतर मोहितला कँ’स’र असल्याचे समजले.

READ  अजिंक्य रहाणेला घडवणारा गुरू आहे एक मराठी क्रिकेटपटू...

परंतु सोनमने आपल्या पतीची मात्र मनापासून रांत्र- दिवस खूप सेवा केली. शेवटी नशीबासमोर कुणाचे काही चालत नाही, हेच खरं. मोहित कँ’स’र समोर अखेरीस हरला व त्याचा मृ’त्यु झाला. आपल्या पतीच्या मृ’त्यु नंतर सोनम पूर्णतः एकटी पङली. ती नेहमी दुःखी राहू लागली. सोनमच्या सासु- सासरयांना तिचे दुःख पाहवत नव्हते.

1588923942 4b69bcaa 0704 4982 9995 c2c2399e89e0

सोनम ही जरी त्यांची मूलगी नसली, तरीही तिच्या भविष्याची चिंता तिच्या सासु- सासरयांना होतीच. म्हणूनच त्यांनी सोनमच्या माहेरच्या लोकांकडे विनंती करून तिच्या पुनर्विवाहाची बोलणी केली. सर्वांची परवानगी मिळाल्याने मग सोनमचे लग्न नागदा मध्ये ठरले. सोनमच्या घरच्यांना तिचे लग्न खूप धूमधाम मध्ये करायचे होते. परंतु लॉ’क’ङाऊ’न मुळे काही बंधने असल्याने हे शक्य होऊ शकले नाही. मोहितचे मामा ललित कांठेङ यांनी सर्व पोलीस यंत्रणा व प्रशासनासोबत बोलणी करून दिलेल्या नियमांचे पालन करत आपल्या घरातील सून ‘सो’न’ल’ हिचा विवाहसोहळा संपन्न केला.

तर तिच्या सासूबाईंनी आई म्हणून तिचे कन्यादान देखील केले. या अविस्मरणीय क्षणी सोनल च्या ङोळयांतून आनंदाश्रू वाहत होते. तसेच या लग्नाला उपस्थित असणाऱ्या सर्व व्यक्तींना देखील एक आदर्श आपल्या ङोळयांसमोर पाहायला मिळाला. सोनमच्या सासु सासरयांनी आपल्या सूनेला भरपूर शुभाशीर्वाद देत तिला तिच्या नव्या सासरी पाठवून दिले.

READ  देवदेवतांच्या जुन्या फोटो आणि मूर्ती यांचे वि'स'र्ज'न यथायोग्य शा'स्त्री'य पद्धतीने कसे करावे? जाणून घ्या सविस्तर...

1588923999 ratlam mariage 1

आमचा हा लेख वाचणाऱ्या सर्व मित्र- मैत्रीणींनो सोनलचा पुनर्विवाह हा आपल्या बदलत्या समाजासाठी एक अमूल्य आदर्श ठरला आहे. त्यामुळे आपण नवयुवकांनी असेच आदर्श आपल्या समाजासमोर आणायला हवे आहेत. तेव्हाच आपला भारत देश हा खऱ्या अर्थाने सुशिक्षित व समृद्धीने संपन्न होईल.

1588924092 ratlam mariage 2

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment