‘तारक मेहता…’ मध्ये लवकरच होणार दया बेनची एन्ट्री, शूटिंगला झाली सुरुवात?
“तारक मेहता का उल्टा चश्मा” जगातील सर्वात लोकप्रिय मालिका. आणि या मालिकेतील जेठालाल या पात्रानंतर सर्वाधिक प्रसिद्ध पात्र म्हणजे दयाबेन. दयाबेन या पात्राला एक वेगळीच लकब, लहेजा आणि साच्याच्या पलीकडे नेऊन ठेवत दिशा वकानीने जी भूमिका साकारली ती निश्चितच अतुलनीय ठरली होती.
मात्र सर्वांच्या पसंतीस उतरलेली दयाबेन अर्थात दिशा वकानी काही दिवसांपासून या मालिकेचा भाग नव्हती. आणि तिच्या नसण्याने मालिकेच्या रसिकप्रेक्षकांवर फार प्रमाणात फरक पडला होता. दिशा वकानी नेमका कधी कमबॅक करणार याबद्दल सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा होत असलेली दिवसेंदिवस पहायला मिळत आहे.
दिशा वकानीच्या दयाबेन या पात्राने केवळ रसिकांच्या मनातच नाही तर अगदी नसानसात अधिराज्य केलयं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर दिशाच्या नावाने तिच्या अनेक चाहत्यांनी इन्स्टाग्राम पेजेसदेखील बनवले आहेत.
या पेजेसच्या माध्यमातून अनेकदा दिशा वकानीच्या पुढच्या गोष्टीबद्दलच्या अपडेट्सदेखील रसिकांना देण्यात येत असतात. दयाबेन या पात्राची मालिकेतील जवळची व्यक्तिरेखा म्हणजे तिचा भाऊ सुंदर आणि तिची आई हे दोघे. त्यातही तिचा भाऊ सुंदर आपल्या लाडक्या बहिणिच्या नवऱ्याला अर्थात जेठालाल ला अनेकदा काही का काही करून पैशांच्या बाबतीत चुना लावत असतो. दुसरीकडे दयाबेनची लाडकी आई केवळ फोनवर संवाद करून, जेठालाल ला रोज विविध प्रकारची नावे देत नामकरण करत असते.
तर दिशा वकानीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असलेल्या काही पेजेसपैकी एका पेजवरून झालेली एक बातमी व्हायरल होत आहे. ती म्हणजे दिशा वकानी लनकरच तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत पुन्हा लवकरच पदार्पण करत आहे. तर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे की नेमकं कोणत्या भागापासून आता पुन्हा दिशा वकानी दयाबेन च्या रूपात त्यांना पाहायला मिळणार.
दिशा वकानीने मालिकेच्या चित्रीकरणाची सुरुवात देखील केली असल्याची बात समोर येत आहे. परंतु यावर अजूनही कोणतेही ठाम स्टेटमेंट तारक मेहता का उलटा चश्माच्या टीमकडून आलेलं पहायला मिळत नाही. अथवा यावर अजूनही स्वत: दिशा वकानीने ही काहीच खुलासा केला नाहीये.
तरीदेखील या पोस्टने चाहत्यांना मात्र एक सुखद दिलासा दिला आहे, हे निश्चित. सोशल मीडियावर चर्चा आणि आनंदाला अगदी उधाण आलं असतानाच नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमधून दयाबेनची एन्ट्री होणार असल्याची छोटीशी हिंट तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेतून दिली गेल्याची पहायला मिळते आहे.
एका युजरने तर चक्क दिशाला “तू अजून किती दिवस चाहत्यांच्या भावनांशी खेळशील, लवकर पुन्हा परतुनी ये” अशी भन्नाट अफलातून दर्दी कमेंटही सुनावली आहे. मुळात आता कधी एकदा दिशा वकानीला तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेतून पुन्हा दयाबेनच्या रूपात पहायला मिळणार ? याचीच एक आतुरता सर्वांना लागलेली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!