प्रियांका चोप्रा आणि निकमध्ये यांचा होणार घटस्फो’ट? पहा काय घडलं या दोघांच्या नात्यामध्ये…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मनोरंजन हे एक असं क्षेत्र आहे की जिथं कधी काय होईल याचा काहीच भरवसा नाही. म्हणजे इथं नाती प्रेमाची पटकन जुळतात. आयुष्य भर साथ देण्याची सुद्धा शपथा खातात; पण काही कारणास्तव ते पुढे जात नाहीत. नाती तिथंच थांबतात. ज्याला आपण ब्रेकअप किंवा घटस्फो’ट असं नाव दिलेलं आहे. आपल्याला प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा माहीत असेल. होय ! तीच जिने परदेशी बाबू निक जोनस सोबत लग्न केलेलं आहे. एकतर प्रियांका इकडं बॉलिवूड मध्ये सुद्धा चांगलीच लोकप्रिय होती.

आणि आता ती हॉलिवूड मध्ये सुद्धा प्रचंड लोकप्रिय झालेली आहे. ती जेव्हा निक ला डेट करत होती. तेव्हापासून तिचं परदेशी प्रेम जास्त उफाळून आलं होतं. मग काय पुढं दोघांनी जाहीरपणे लग्न केलं आणि प्रियांका चोप्रा भारताला सोडून सासरला अमेरिकेत गेली. आणि तिकडेच स्थायिक झाली. अधून मधून ती इकडच्या सिनेमात दिसत होती. आणि तिकडे ही काम करत होती. तिचं तिकडं एक भारतीय पध्दतीने जेवण मिळणारं एक हॉटेल सुद्धा आहे. चांगले दिवस चालले होते. प्रियांका सोशल मीडियावर जास्त कार्यरत असते.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मुंबईत आली रस्त्यावर राहायची वेळ, जाणून घ्या काय आहे खरे कारण...

तिचा चाहता वर्ग कोटींच्या घरात आहे. रोज फोटो नाहीतर व्हिडीओ टाकून अपडेट देत असते. चाहत्यांना ही आनंद होता की चला म्हणजे दोघे नवरा बायकोच चांगलं चाललं आहे. कुणाचं ही चांगलं होवो व त्याच्या पाठी आपलं होवो. प्रियंका ने सोशल मीडियावर निक चं आडनाव लावलं होतं तिच्या नावाच्या पुढं.

जस इकडं भारतीय मध्ये लावतात. पण अचानक नुकतंच तिने ते आडनाव सोशल मीडियावरन हटवलेलं आहे. त्यामुळे प्रियांका चोप्रा प्रचंड चर्चेत आलेली आहे. अनेकांना अशी शक्यता वाटते आहे की निक आणि प्रियांका यांच्या नात्यात दुरावा आला आहे. पण कसं असतं हे इथून बोलणं सोपं असतं;

पण खर वेगळं असतं. 22 नोव्हेंबर ला प्रियांका ने तिच्या इंस्टा हँडल वरून निक चं जोनस हे आडनाव हटवलेलं आहे. त्यामुळे अनेकांना घटस्फो’ट होणार अशी शंका आहे. चाहते ट्विटर वर आणि इतर ठिकाणी तिला विचारत आहेत की काय गडबड झाली तर त्यावर अजून तरी तिचं काही उत्तर आलेलं नाही. प्रियांका ने फक्त निकचं नाहीतर तिचं स्वतःच चोप्रा हे आडनाव सुद्धा काढलेलं आहे. तिची आई ही जावई आणि मुलांसोबत परदेशात असते. तर प्रियांका चोप्रा च्या आई ने म्हंटलं आहे की ही अफवा आहे. यात काही तथ्य नाही. तर असं आहे ब्वा हे प्रकरण. बघू पुढं काय घडतंय.

See also  पद्मिनी कोल्हापुरे यांनी तब्बल इतक्या वर्षांनंतर केला स्वतःच्या लग्नाबाबत धक्कादायक खुलासा...
Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment