देशातील पहिल्या ‘महिला बाउन्सर’ ग्रुपची सर्वेसर्वा आहे ही महाराष्ट्रातील रणरागिणी, त्यांचा खडतर प्रवास वाचून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘रणरागिणी’ हा देशातील पहिला महिला बाउन्सर ग्रुप आहे, ज्याच्या सर्वेसर्वा आहेत मराठमोळ्या दीपा परब. ‘रणरागिणी’ हा शब्दच खरेतर सर्वकाही सांगणारा आहे. प्रत्यक्ष रणांगण गाजविणाऱ्या रणमर्दिनी साठी आपल्या मराठी भाषेत हा शब्द वापरला जातो.

स्त्री जीवनाच्या लढाईतील समाजाच्या, तर कधी पुरुषप्रधान विचारसरणीच्या, कधी स्त्रियांच्या कार्यक्षमतेबद्दलच्या संशयी स्वभावाच्या मानसिकतेशी संघर्ष करून आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या स्त्रियांची ही कहाणी म्हणजे हा “रणरागिणी ” महिला बाउन्सर ग्रुप.

पुण्यातील सौ. दीपा परब, या रणरागिणी महिला बाउन्सर ग्रुपच्या सर्वेसर्वा. ज्यांनी मनाला न पटणाऱ्या समाजाच्या नियम व विचारांना झुगारुन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. जनसामान्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी दीपाने स्थापन केलेला “रणरागिणी ” हा देशातील पहिला महिला बाउन्सर ग्रुप आहे. चला जाणून घेऊया रणरागिणी दीपा परब यांचा हा खडतर प्रवास.

रणरागिणी ” महिला बाउन्सर ग्रुप स्थापनेचा उद्देश: दीपा परबला पो-ली-स खात्यात स्वतःचे करिअर घडवायचे होते, पण तिला स्वत:च्या घरच्यांकडूनच परवानगी मिळाली नाही. तिला पो-लि-स कॉ-न्स्टे-ब-ल व्हायचे होते आणि किरण बेदी, मीरा बोरवणकर यांच्यासारख्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून समाज बदलण्याची इच्छाही होती. पण तिला संधीच मिळाली नाही. तिचा पो-लि-स भरती फॉर्म तिच्या डोळ्यासमोर फा-ड-ला गेला.

परंतु तिने हार मानली नाही आणि महिला बाउन्सर ग्रुप सुरू करण्याचा निर्णय घेतला. ती पोलिस भरती परीक्षा उत्तीर्ण न होऊ शकलेल्या सर्व महिलांकडे पोहचली. त्या सर्व महिलांना प्रेरित करुन, रणरागिणी बनवून, लोकांच्या रक्षणाचे कार्य हाती घेण्याचे धैर्य दिले. सुरुवातीस बारा महिलांसह सुरू केलेल्या या महिला बाउन्सर ग्रुप मधे आजमितीस पाचशेच्या वर प्रशिक्षित महिला बाउन्सर कार्यरत आहेत. आणि दिवसेंदिवस हा ग्रुप वाढत आहे.

See also  अभिमानास्पद! शेतकऱ्याच्या मुलीची जागतिक विश्वविक्रमासाठी निवड, उपग्रह निर्मिती करून रचनार इतिहास...

तथाकथित सामाजिक चौकट भे-दू-न स्वतःचे वेगळे असे अस्तित्व बनवू पाहणाऱ्या दीपा परबवर समाजातून सतत टी-का होत राहिली. जेव्हा त्यांनी पहिला प्रोजेक्ट घेतला तेव्हा प्रत्येक टप्प्यावर होणारी समाजाची टी-का हीच प्रमुख अ-डचण होती. मंदिरातील धार्मिक कार्यक्रमा दरम्यानच्या सुरक्षा व्यवस्थेचे ते काम होते.

पण तिथे लोकांच्या नजरेत कु-चे-ष्ठेचेच भाव दिसत होते. त्यांनी बऱ्याच लोकांना असे म्हणताना ऐकले की, या महिला काय बाउन्सर म्हणून काम करण्यास सक्षम असतील का? यांच्याच्याने एवढी मोठी गर्दी थोपवेल का? अशा अनेक प्रश्नांचा त्यांच्यावर पाऊस पाडला. पण त्यांनी हार मानली नाही आणि स्वतःला सिद्ध केलं.

रणरागिणी गटात महिलांना प्रवेश आहे, परंतु यासाठी त्यांना कुटुंबाच्या वि-रोधावर मात करावी लागेल. दीपा सांगते, “रणरागिणीत प्रवेश देण्यापूर्वी आम्हाला त्या महिलेची कौटुंबिक पार्श्वभूमी पहावी लागते. पो-लि-स व्हेरिफिकेशन नंतरच आम्ही त्या महिलेस प्रवेश देतो. तसेच, त्यांना वजन आणि उंची संबंधित काही शारीरिक परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. विशेष म्हणजे या सर्व वैयक्तिक आ-व्हानांवर महिला सहज मात करतात. परंतु त्यांच्या कुटुंबीयांना समजावून सांगणे हेच अनेकदा मोठे आव्हान ठरते. मी स्वतः जाऊन त्यांच्या कुटुंबियांना समजावते, जर मी यात यशस्वी झाले तर त्या महिलेला रणरागिणी बनण्याची संधी मिळते. ”

See also  स्त्रियांमध्ये असतात या रहस्यमय गुपित गोष्टी, ऐकून तुम्हालाही ध'क्का बसेल...

दीपा परब यांना स्त्री-पुरुषांमधील सामाजिक भे-द-भा-व कमी करायचा आहे. दीपा म्हणते की, “रात्री काम करणे ही पुरुषांची म-क्ते-दारी आहे का? महिला रात्री बाहेर का जाऊ शकत नाहीत? दरवेळी तिच्या नै-तिकतेबद्दल आणि चारित्र्यावर शं-का का घेतली जाते? मला रणरागिणी बनून या प्रश्नांची उत्तरे समाजाला द्यायची आहेत. रात्री घराबाहेर काम करण्याचा चारित्र्याशी काही संबंध नसतो. लोकांना त्यांची ही संकुचित मानसिकता बदलावी लागेल आणि केवळ महिलाच त्यामधे बदल करू शकतील. ”

दीपा परब स्वतःचे घर चालविण्यासाठी पतीला त्यांच्या व्यवसायात मदत करतत्, आणि रणरागिणीच्या एका प्रोजेक्टमधून त्या स्वत: साठी फक्त १०० (शंभर)च रुपये घेते. आणि ती ही रक्कम त्या समाजकार्यासाठी खर्च करतात.

अशाच एका सामाजिक घटनेचे वर्णन करताना दीपा सांगतात, “एक दिवस पो-लि-स ठाण्यात एका मुलीच्या घरातील लोकांनीच तिला घराबाहेर काढले. मुलीच्या आईने तर तिला हाकललेच होते. कुठेही जा, काहीही कर, पण परत येऊ नको असे बजावले. मला ते सहन झाले नाही. मी पुढे जाऊन म्हणाले की, ” जर कोणी तुला दत्तक घेणार नसेल तर आजपासून मला तुझी आई मान”.

See also  खूप वर्षांनी जुळून आलाय हा गुरुपुष्यामृत योग, श्री लक्ष्मीदेवींना प्रसन्न करण्यासाठी जाणून घ्या पूजनविधी, मंत्रसाधना...

त्यावर पोलिसांनी मला सांगितले की त्या मुलीच्या अभ्यासापासून ते लग्नापर्यंतची जबाबदारी मला उचलावी लागेल. मी ताबडतोब मान्य केले आणि त्या मुलीला दत्तक घेतले. आज ती तिच्या संसारात तिच्या पती आणि दोन मुलांसह आनंदी आहे. तिने अभ्यास केला, लग्न केले आणि आज ती तिच्या कुटुंबाचे पालनपोषण करीत आहे.” रणरागिणी मधून एका प्रोजेक्टमागे मिळणाऱ्या १०० रुपयांतून दीपा परब यांनी आत्तापर्यंत अनेक मुलींचे संसार उभे करून दिले आहेत. ”

पतीची खंबीर साथ: “स्त्रिया पुरुषांपेक्षा हुशार असतात!” हे शब्द आहेत दीपा परब यांचे पती श्री. दीपक परब यांचे. ज्यांच्या खंबीर पाठिंब्या शिवाय रणरागिणी अस्तित्त्वातच आली नसती. श्री. दीपक परब म्हणतात, “स्त्रियांना नेहमी, तुम्ही बाहेर जाऊन काम करू शकणार नाहीत”, असे सांगून मोडता घातला जातो. पण सत्य हे आहे की, पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त सहनशील, कर्तृत्ववान आणि हुशार असतात. प्रत्येक समस्या त्या चुटकीसरशी सोडवतात. चांगले कार्य आणि प्रेरणादायी बदलांचे कारण बऱ्याचदा स्त्रियाच असतात. त्यांना अडवण्याऐवजी आपण त्यांचे समर्थन केले पाहिजे. स्त्री सर्व काही करण्यास सक्षम असते आणि ती बरोबरीच्या सगळ्यांचेच भले करते ”

या प्रेरणादायक शब्दांमुळे तुम्हाला कळले असेलच की, की दीपा परब यांच्या रणरागिणीला पुढे आणण्यात श्री. दीपक परब यांचा किती मोठा हात आहे ते. सौ. दीपा परब त्यांच्या पतीला गुरू आणि रणरागिणीचा मुख्य आधारस्तंभ मानतात.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment