अरेच्चा! अजय देवगण सोबत लग्न करण्याआधी या व्यक्तीच्या प्रेमात वेडी झाली होती काजोल, अजयला कळल्यानंतर…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक असे अनेक ब्युटीफूल कपल आहेत. बऱ्याच स्टार्स कपलची लव्हस्टोरी ही काहीशी ढिंकचाक असते. यामध्ये अभिनेता अजय देवगण आणि काजोल हे एक फेमस कपल आहे. या दाम्पत्याला आता न्यासा आणि युग अशी दोन मुलं आहेत. कित्येक कार्यक्रमात ते आपल्या मुलांना सोबत घेऊन येतात.

त्याचप्रमाणे सोशल मीडियावर सुद्धा ते आपल्या मुलांचे फोटोज सुद्धा शेअर करतात. काजोल आणि अजय देवगण यांची प्रेमकथा ही तशी खूपच रोमँटिक आहे. कारण जेव्हा या दोघांचीही एकमेकांसोबत पहिली भेट झाली, तेव्हा हे दोघेही दुसऱ्याच कोणासोबत तरी रिलेशनशिपमध्ये होते. हे ऐकायला थोडे विचित्र वाटत असले तरीही ही गोष्ट त्या दोघांनीच आपल्या एका मुलाखतीतून स्पष्टपणे सांगितली आहे.

See also  करोडोंची मालकीण असूनही आता शेती करतेय हि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, म्हणते, "आता मी शेतकरी आहे"

तुम्हांला ठाऊक आहे का, काजोल लग्नाआधी आपल्याच एका मित्राला डेट करत होती. त्यावेळी काजोल आणि तिच्या मित्राची अफेअरची चर्चा चांगलीच मीडियात रंगली होती. काजोल आणि कार्तिक मेहता हे दोघे एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स होते. ते दोघेही एकमेकांना अनेक वर्ष डेट करत होते. अभिनेत्री काजोल आणि अजय यांची पहिली भेट “हलचल” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती.

तेव्हा पहिल्याच भेटीत काजोलला अजय हा खूप एकलकोंडा असल्याचे वाटले. तर अजयला काजोल ही सेटवर सर्वांत जास्त मस्ती करताना जाणवली. त्याचप्रमाणे ती खूपच जास्त वायफळ बडबड करत असल्याचे त्याला वाटले. याच कारणामुळे ते दोघेही एकमेकांपासून अतिशय वेगळे आहेत, हे त्या दोघांच्याही लक्षात आले. मात्र याच एका कारणामुळे ते दोघे खरंतर एकमेकांच्या जवळ आले, हे देखील तितकेच खरे आहे.

See also  अभिनेता धर्मेंद्र यांच्या कुटुंबावर आहे करोडोंचे कर्ज, एकट्या सनी देओलवर आहे एवढ्या कोटींचे कर्ज...

त्यानंतर “गुंडाराज” या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. त्यावेळी काजोल तर कार्तिकला डेट करत होती. मात्र त्यांच्या नात्यात बरेच वादविवाद सुरु होते, त्यासाठी काजोल अजयकडूनच प्रत्येक गोष्टीचा सल्ला घेत असे. तर दुसरीकडे अजय देवगण हा अभिनेत्री करिश्मा कपूरला डेट करत होता. रविना टंडन सोबत ब्रेकअप झाल्यावर अजय करिश्माच्या प्रेमात पडला होता. त्या काळात त्यांच्या अफेअर्स च्या चर्चांनी धुमाकूळ माजवला होता. पण नंतर काही काळातच काजोलचे कार्तिकसोबत आणि अजयचे करिश्मासोबत ब्रेकअप झाले. त्यांनतर अजय व काजोलचे प्रेमाचे सूर जुळून आले व त्यांनी काही वर्षांनी एकमेकांसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  आर्यनच्या जन्माच्या वेळी गौरी खानला प्रचंड वेदना होत होत्या, शाहरुखला वाटलं आता ती मरतेय...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment