“येऊ कशी तशी नांदायला” मालिकेतील चिन्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल जाणून घ्या…
मराठी मालिका पाहण्याकडं प्रेक्षकांचा कल वाढलेला दिसून येत आहे. त्यामध्ये झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स सोबत इतर ही सोनी मराठी सारखे अनेक चॅनेल आहेत. ज्यावर घरगुती, ऐतिहासिक अश्या अनेक वेगवेगळ्या विषयांवर मालिका चालू आहेत. त्यातली झी मराठी वर चालू असलेली एक मालिका खूप लोकप्रिय होत आहे. प्रेक्षकांना खूप भावत आहे. त्यांना भुरळ पाडत आहे.
आता आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं कोणत्या मालिकेबद्दल बोललं जातं आहे. तर येऊ कशी तशी की नांदायला बद्दल. तिचं कथानक हे घरातल्या महिलांना किंवा इतर प्रौढ यांना खूप आवडतं आहे. म्हणून सध्या मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. तर त्यातील सगळेच कलाकार हे उत्तम भूमिका बजावत आहेत. पण ज्यात एक तरुण मुलगा सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
चिन्या तर सगळ्यांना माहीतच असेल. जो नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने काम करतो आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. तर चिन्याची भूमिका करणारा अभिनेता खऱ्या आयुष्यात सुद्धा पडद्यावर आहे तसाच असणार की बदलणार याची माहिती जाणून घेण्याची तुम्हाला चांगलीच उत्सुकता असणार तर जाणून घेऊ चला.
चिन्या साकारणारा मुलगा रियल लाईफ मध्ये खूप वेगळा आहे. मालिकेत उत्तम काम करत असल्याने रिअल लाईफमध्ये चिन्या म्हणजे अर्णवच्या लोकप्रियतेत सुद्धा दिवसागणिक वाढ होत चालली आहे. सोशल मीडियावर त्याला फोल्लो करणारा वर्ग वाढत चालला आहे. मालिका जेव्हा लोकप्रिय होते तेव्हा त्या मालिकेतील कलाकारांची जबाबदारी अजून वाढते. कारण मग त्या लोकप्रिय गोष्टी सारखं काम करावं लागत असतं.
खरतर चिन्या सारखा उत्तम अभिनेता कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देऊ शकतो. पण ही भूमिका साकारणे अर्णवसाठी आव्हानात्मक होते पण मालिका या माध्यमाबद्दल आणि त्यात काम करण्याच्या अनुभवाबद्दल त्याने सांगितले की,असा एक भाऊ हवा असं चिन्यांकडे बघून सगळ्यांना वाटतं. अभिनेता अर्णव राजे ( arnav raje ) ही भूमिका अत्यंत चोख बजावतोय. त्याच्या भूमिका मध्ये तो अभ्यास पूर्ण काम करत आहे. त्यामुळे चाहत्यांना खूप आवडत आहे.
आता असे अभिनेते काम करत असताना कधी खाजगी आयुष्य बद्दल बोलून जातील सांगता येत नाही. तर नुकतेच काय झालं की अर्णवने मालिकेत काम करत असताना त्याचा अनुभव आणि काही खासगी गोष्टीही चाहत्यांसह शेअर केल्या आहेत.मला अभिनयाची गोडी लहानपणापासूनच लागली होती. माझे वडील अभिनय क्षेत्रात असल्यामुळे अभिनयाचं बाळकडू लहानपणापासूनच मिळालं आहे. त्यांनी दिलेलं प्रोत्साहन माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. आता कुणाचे ही वडील त्याजागी असले तरी बळ देणारच. आणि चिन्या ही उत्तम प्रकारे घडत आहे.
एखाद्या ठिकाणी पाहिलेलं काम हे नक्की कधी न कधी फायद्यात ठरत असतं. त्यामुळे काम करत राहायचं. कष्टाला स्टॉप नाही करायचं. यश मिळतं. येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर सुवर्ण राणे यांनी माझं एकांकिकेतील काम पाहिलं होतं. त्यामुळे मला या मालिकेत संधी मिळाली.मला सर्वजण म्हणतात कि मी चिन्यासारखाच आहे. पण खऱ्या आयुष्यात मी चिन्यांच्या अगदी उलट स्वभावाचा आहे. आणि तस असतच ना. माणूस कलाकार म्हणजे तेच पडद्यावर जे ते खऱ्या आयुष्यात नाही. मग पडद्यावर काहीही असू शकतो ना. बंधने कसली त्याला.
चिन्या म्हणजेच अर्णव असे म्हणतो की या क्षेत्रात स्थिर व्हायला आधी कलेने स्थिर व्हायला लागतं. साधनेतून प्रगल्भ व्हावं लागतं. तस मला माझे गुरू आणि आईवडील यांनी खूप मार्गदर्शन केले. आज त्यांच्या मुळेच इथे आहे.
तर अश्या प्रकारे अर्णव नावाचा हिरो मराठी इंडस्ट्री त आलेला आहे. तर त्याला त्याच्या पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा. असेच काम करून खूप मोठा हो..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.