“येऊ कशी तशी मी नांदायला” या प्रसिद्ध मालिकेतील कलाकारांची खरी नावे आणि रंजक किस्से ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो!, “येऊ कशी तशी मी नांदायला” ही नवीन मराठी मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. अतिशय अल्पावधीतच रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे मालिकेचे कथानक आणि मुख्य म्हणजे या कथेच्या पात्रांमध्ये जान ओतणारी मालिकेतील अनुभवी कलाकारांची टीम हेच खरेतर या मालिकेचे बलस्थान आहे.

कथानक आणि अभिनय यांची परफेक्ट सांगड बसल्यामुळे अगदी छोट्याशा काळातच ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तसे पाहिले तर झी मराठीने त्यांच्या काही लोकप्रिय ठरलेल्या परंतु आता लांबत चाललेल्या जुन्या मालिकांच्या शेड्युलमध्ये बदल करून या नवीन मालिकेला प्राईम टाईम देऊन जरा रिस्कच घेतली असे वाटत असतांनाच या मालिकेच्या कथानकाने आणि त्यातील कलाकारांनी एकत्रितपणे अतिशय उत्तम प्रतिसाद मिळवून झी मराठीचा हा प्रयत्न सार्थकी ठरवलेला पाहायला मिळतोय.

See also  प्रसिद्ध गायक आदर्श शिंदेची पत्नी आहे खूपच सुंदर, पहा तिचे सुंदर फोटो...

Yeu Kashi Tashi Mi Nandayla Zee Marathi

अन्वीता फलटणकर या मुलीने मुख्य पात्र स्वीटू साकारले आहे. प्रेक्षकांनी तिला यापूर्वीही अनेक चित्रपटांत व टी. व्ही. शोज पाहिलेले आहेच. २०१४ मधील टाईमपास तसेच २०१९ सालच्या गर्ल्स ह्या चित्रपटांमधूनही ती रसिकांसमोर आली होती. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ यासारख्या टी व्ही शो व काही जाहिरातीतूनही झळकली होती.

शाल्व किंजवडेकर हा तरुण देखणा अभिनेता या मालिकेत मुख्य हिरोच्या म्हणजेच ओंकार खानविलकरच्या भूमिकेत उत्तम काम करत असून त्याचा सहज वावर आणि नैसर्गिक अभिनय रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून त्यांच्या कौतुकांस पात्र होत आहे. शाल्वने या मालिकेच्या पूर्वी “अ’लि’बा’बा आणि चा’ळि’शी’त’ले चो’र” या त्याच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात भूमिका केली होती. त्याचप्रमाणे त्याने एक सांगायचंय, बकेट लिस्ट, डे’ड ए’न्ड सारख्या चित्रपटातून त्याने काम केले आहे. त्याने हं’ट’र या फिल्म मधेही भूमिका केली आहे. शाल्वला चित्रपट निर्मितीची सुद्धा आवड असून त्याने स्वतः ‘अंतरंग’ ही शॉर्टफिल्म सुद्धा बनविली होती.

See also  "महाराष्ट्राचा बेस्ट डान्सर" च्या स्पर्धकाला प्रसिद्ध मराठी उद्योजक प्रेक्षकाने दिलीय नोकरी, पण ठेवलीय ही भन्नाट अट...

हे तर झाले दोन्ही प्रमुख कलाकार. परंतु या मालिकेच्या लोकप्रियतेत या दोघांइतकाच इतर सहकालाकारांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याही उत्तम अभिनयाचा साज या मालिकेला लाभला आहे.

भागो मोहन प्यारे मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ‘दीप्ती केतकर’ यांनी या मालिकेत स्वीटूच्या आईची अर्थात नलिनीची भूमिका साकारली आहे.
एका सर्वसामान्य कुटुंबातील प्रमुख, स्वीटूच्या बाबांची भूमिका ‘उदय साळवी’ यांनी अगदी सुरेख बजावलेली पाहायला मिळतेय. या मालिकेच्या अगोदर घाडगे अँड सून सारख्या मालिकेतून ते प्रेक्षकांसमोर आलेलेच आहेत.

अभिनेत्री ‘शुभांगी गोखले’ यांनी ओंकारची आई म्हणजेच मालिकेतील शकूची भूमिका साकारली असून त्यांच्या या भूमिकेचे भरभरून कौतुक केले जात आहे.
मालिकेत ओंकारच्या वडिलांची भूमिका साकारली आहे ‘मिलिंद जोशी’ या ज्येष्ठ कलाकारानी.

स्वीटूच्या काकूंची भूमिका अभिनेत्री शुभांगी भुजबळ यांनी साकारली असून या मालिकेअगोदर व्हय मी सावित्रीबाई, पतंगाची दोरी, चार दोन तुकडे, संगीत एकच प्याला, जुगाड, इयत्ता, गाव गाता गजाली अशा नाटक, मालिका आणि चित्रपटातून काम केले आहे.

See also  खूपच रंजक आहे "चला हवा येऊ द्या" फेम अभिनेत्री श्रेया बुगडेची लव्हस्टोरी, वाचून थक्क व्हाल!

याशिवाय लोकप्रिय अभिनेत्री आदिती सारंगधर ही ओंकारची बॉसी बहीण मालविका खानविलकरच्या भूमिकेत झळकत आहे. निखिल राऊत हा मोहित परब नावाच्या खानविलकरांच्या मॅनेजरच्या भूमिकेत झळकतोय. याशिवाय त्रियुग मंत्री रॉकी आणि अर्णव राजे हा चिन्मयच्या भूमकेत आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment