‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या लोकप्रिय मालिकेतील स्विटूचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल !
सध्या झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना भुरळ घालणारी एक मालिका खूप चर्चेत आहे. ते म्हणजे काम करणाऱ्या कलाकारांच्या जीवतोड अभिनय शैली मुळे. आज मालिका तर चर्चेत आहेच; पण त्याच सोबत त्यातील कलाकार ही घराघरांत पोचलेली आहेत.
ज्या मालिका बद्दल आपण बोलत आहोत. तिचं नाव आहे येऊ कशी तशी मी नांदायला. होय त्यातील ओम स्विटू ची जोडी खूप प्रसिद्ध झालेली आहे. त्यात सोशल मीडियावर ही त्यांचे फॅन्स फोल्लो वाढले आहेत.
त्यात स्विटू ची भूमिका साकारणारी अभिनेत्री तिच्या निरागस अभिनया मुळे चाहत्यांना भुरळ घालत आहे. सध्या सोशल मीडियावर ती फार अपडेट असते. तिला डान्स ची सुद्धा आवड आहे. तर तिचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. तर ती अभिनेत्री कोण आणि व्हिडीओ कोणता हे सगळं सविस्तर जाणून घेऊयात चला.
येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेने फार कमी वेगळात प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळ स्थान निर्माण केलंय.. या मालिकेतील प्रत्येक पात्राचं मोठं फॅन फॉलोविंग तयार झालंय. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील स्वीटू अर्थात अन्विता फलटणकर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती फॅन्सच्या संपर्कात असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते आणि त्यांना चाहत्यांची देखील पसंती मिळते. अन्विताला अभिनयासोबतच डान्सची देखील आवड आहे.
यंदाच्या झी पुरस्कार सोहळ्यात ही स्वीटूनं आपल्या डान्सचा जलवा दाखवला होता. तिचे डान्स करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे ज्यात ती आई नलूसोबत डान्स करताना दिसतेय.
माय-लेकी व्हायरल गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसातयेत. अभिनेत्री दिप्ती केतकर या मालिकेत नलिनी म्हणजेच नलूच्या भूमिकेत आहे.
स्मॉल स्क्रिनवरील टॉप मालिकांपैकी एक असणाऱ्या या मालिकेतील स्वीटूचा निरागस अंदाज सगळ्याचच लक्षवेधून घेणारा आहे.अन्विताने याआधीही मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. रवी जाधव दिग्दर्शिक ‘टाईमपास’मध्ये केतकी माटेगावकरच्या मैत्रिणीची भूमिका अन्विताने साकारली होती.
आज स्विटू ही भूमिका तिने खूप उत्तम प्रकारे वठवली आहे. तिचा स्वतःचा एक चाहता वर्ग तयार झालेला आहे. तिचे चाहते तिच्या सोशल मीडियावर खूप अपडेट असतात. तिच्या व्हिडीओ आणि फोटो वर लाईक कॉमेंट आणि शेयर ही करतात.
स्विटू ला अश्याच उत्तम भूमिका साकारणाची संधी मिळो आणि तीही असेच तिचं सोन करू. तिला तिच्या पुढील यशस्वी वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.