अभिनेत्री सायली संजीव हिच्या ‘दाह’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

झी टॉकीजने कायमच आपल्या प्रेक्षकांना वेग वेगळ्या सिनेमांची मेजवानी देऊन मनोरंजित केलं आहे. सायली संजीव हिची प्रमुख भूमिका असलेला ‘दाह’ सिनेमा झी टॉकीज प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. रविवारी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता हा सिनेमा झी टॉकीज वर प्रदर्शित होणार आहे.

जगण्यासाठी नाती महत्त्वपूर्ण असतात. नातेसंबंधातील कोमलता आपल्याला आयुष्यातील संकटांचा सामना करण्याचे सामर्थ्य देते. हा संदेश आपल्याला दाह एक मर्मस्पर्शी कथा.. या सिनेमामधून मिळतो. या चित्रपटात सायली संजीव सोबत, सुहृद वार्डेकर, गिरीश ओक, राधिका विद्यासागर, यतीन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौगुले यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या घरी हालणार पाळणा, ख्रिसमसच्या निमित्त दिली चाहत्यांना गुडन्यूज...

‘दाह’ या चित्रपटाची कथा दिशा (सायली संजीव) या व्यक्तिरेखेभोवती फिरते. मेडीकलच्या शेवटच्या वर्षाला ती शिकतेय. सुप्रसिद्ध डॉक्टर साने (डॉ. गिरीश ओक) आणि अनघा साने (राधिका विद्यासागर) यांची मुलगी. दिशा ही साने कुटुंबीयांची दत्तक मुलगी आहे. परंतु ही बाब स्वतः दिशा आणि तिच्या आईला म्हणजेच अनघा साने हिला देखील माहित नाही.

दिशा आणि तिचा मित्र डॉ. समीर भोसले (सुहृद वार्डेकर) एकमेकांच्या प्रेमात पडतात. समीर आणि दिशाच्या लग्नाची बोलणी सुरु होते. सर्व सुरळीत सुरु असताना समीरच्या घरच्यांकडून अचानक लग्नाला विरोध दर्शवला जातो. पण, या विरोधाचं कारण काय? अमेरिकेला गेलेला समीर पुन्हा भारतात येतो का? समीर आणि दिशा यांचं लग्न होतं का?

दिशा साने कुटुंबाची दत्तक मुलगी आहे ही सत्य परिस्थिती तिला समजते का? दिशा आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून पुढे काय करते? या सगळ्याची उत्तरं ‘दाह’ सिनेमात दडलेली आहेत. पाहायला विसरु नका दाह रविवारी म्हणजेच ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.

See also  "ती परत आलीये" या मालिकेतील मुख्य अभिनेत्री आहे खुपच सुंदर, नाव ऐकून विश्वासच बसणार नाही...

Leave a Comment