कादंबरीची भूमिका ही कलाकार म्हणून अधिक प्रभल्भ करुन देणारी – अभिनेत्री पूजा बिरारी

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

पदेशातून मुंबईमध्ये आलेला नचिकेत आणि मुंबईतल्या एका मध्यमवर्गीय घरामध्ये वाढलेली संस्कारी सई यांची साधी सरळ प्रेमकथा म्हणजे झी युवा वाहिनीवरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका. परस्पर विरुद्ध दोन टोकांच्या वातावरणामध्ये वाढलेल्या या दोघांमध्ये तयार होणारी मैत्री, आकर्षण आणि त्यानंतरचं त्यांचं प्रेम या अनुशंघाने मालिकेची कथा उलगडताना दिसते.

पण आता यात एक ट्विस्ट आलंय आणि हे ट्विस्ट आणलंय नचिकेतच्या ऑस्ट्रेलियामधून आलेल्या खास मैत्रिणीचं. कादंबरी म्हणजेत कॅडी नचिकेतच्या घरात येते आणि त्यानंतर अनेक गोष्टी बदलताना दिसतात. मालिकेमध्ये या हॅपी गो लकी कॅडी म्हणजेच कादंबरीची भूमिका साकारतेय अभिनेत्री पुजा बिरारी.

See also  हाॅ'ट अदांसाठी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेच्या नव्या सिनेमाचा ट्रेलर तुम्ही पाहिला का? ट्रेलर पाहून थक्क व्हाल!

Pooja Birari

यापुर्वी साजणा या मालिकेमध्ये रमाची भुमिका यशस्वीपणे साकारणाऱ्या पुजाची अभिनेत्री म्हणून ही दुसरी मालिका आहे. या भुमिकेबद्दल बोलताना पुजा खुप उत्साही दिसते, ती म्हणाली, “या पु्र्वी तुम्ही मला अत्यंत साध्या सरळ रमाची भुमिका साकारताना पाहिलं. आणि आता ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये मी रमाच्या एकदम विरुद्ध अशी कांदबरी साकारतेय. मालिकेमध्ये माझ्या व्यक्तिरेखेचा नुकताच प्रवेश झालाय. त्यामुळे मी खुपच उत्साही आहे. माझ्यासाठी रमा काय किंवा कादंबरी काय दोनही भुमिका मनाच्या खुप जवळ आहेत.”

पुजा पुढे सांगते की, “कॅडी ही आजची आधुनिक विचारांची मुलगी आहे ती खुप अल्लड आहे मस्तीखोर आहे बिनधास्त आहे कॅडी साकारण्यापुर्वी मी याप्रकारच्या आधी साकारल्या गेलेल्या काही भुमिकांचा अभ्यास केला. माझ्यासाठी ही भुमिका एक मोठं आव्हान आहे यात माझ्या अभिनयाचा कस लागतोय हे महत्वाचं.”

See also  "लाडाची मी लेक गं!" मालिकेतील या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरी छोट्या पाहुण्याचे झाले आगमन...

सध्या लॉकडाऊनमुळं काही महिने बंद झालेली शुटिंग्ज आता सुरु झालीयेत यावातावरणात शुट करतानाचा अनुभव पुजा शेअर करताना सांगते की, “माझी आधीची मालिका संपली आणि लगेच लॉकडाऊन सुरु झालं, त्यामुळे मी शुटिंग खुप मिस करत होते पण नशिबाने काही महिन्यातच मला ही नवी मालिका मिळाली आता लॉकडाऊन हळूहळू कमी होताना आमच्या शुटिंगलाही जोरदार सुरुवात झालीये. कॅडीची व्यक्तिरेखा मला खुप आवडली या व्यक्तिरेखेला खुप साऱ्या शेडस् आहेत त्यामुळे ऐकताक्षणी लगेचच मी होकार दिला. शिवाय मी मालिकेतल्या माझ्या सहकलाकारांना आधीपासूनच ओळखत होते त्यामुळे मला सेटवर रुळायलाही फार वेळ लागला नाही.

आम्ही सगळेच शुटिंगदरम्यान खुप धमाल करतो.” मित्र मैत्रिणींसोबत काम करताना आपलं काम अधिकच खुलतं असा माझा अनुभव आहे कॅडीला प्रेक्षकांकडून जो सकारात्मक प्रतिसाद मिळतोय यातनं हेच सिद्ध होतंय”, अशी प्रांजळी कबूलीही पुजाने यावेळी दिली.

See also  अभिनेत्री अलका कुबल यांच्या मुली आहेत त्यांच्या इतक्याच सुंदर, सध्या करतात क्षेत्रात काम...

कॅडी नचिकेत आणि सई यांचा हा प्रेमाचा त्रिकोण आणि त्यात अप्पा यांच्या कटू कटाक्षाचे तीर यामुळे ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेची रंगत वाढू लागलीये. त्यात आता कॅडीची व्यक्तिरेखा अजून काय नवे रंग भरतेय आणि त्यातनं मालिकेमध्ये कोण कोणते ट्विस्ट येणार हे यापुढे पहाणं उत्सुकतेचं ठरणारे. तेव्हा न विसरता पहात रहा ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका फक्त झी युवा वाहिनीवर.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment